Lok Sabha election 2024 if narendra modi return as pm for 3rd term these stocks and sector may big beneficiary  Sakal
Share Market

Stock Market: मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कोणते शेअर्स करतील मालामाल? ब्रोकरेजने वर्तवला अंदाज

Lok Sabha Election 2024: पुढील 5 वर्षांसाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात, भारताच्या आर्थिक विकासाला आणखी बळकट करण्यासाठी नवीन उपाययोजनांसह, पूर्वीची सर्व धोरणे सुरू ठेवली जातील आणि अधिक चांगली केली जातील असे म्हटले आहे.

राहुल शेळके

Lok Sabha Election 2024: पुढील 5 वर्षांसाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात, भारताच्या आर्थिक विकासाला आणखी बळकट करण्यासाठी नवीन उपाययोजनांसह, पूर्वीची सर्व धोरणे सुरू ठेवली जातील आणि अधिक चांगली केली जातील असे म्हटले आहे.

पायाभूत सुविधा, उत्पादन, निर्यात, एमएसएमई, रोजगार, ग्रामीण उत्पन्न आणि तरुण आणि महिला सशक्तीकरण यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यात म्हटले आहे. पायाभूत सुविधांच्या अंतर्गत, गृहनिर्माण, संरक्षण, रेल्वे, विमान वाहतूक, ऊर्जा, रस्ते, ईव्हीवर लक्ष केंद्रित केले जाईल.

सध्या या जाहीरनाम्यानंतर ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, जी धोरणे सुरू आहेत ती सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. यामुळे विविध क्षेत्रातील काही शेअर्समध्ये तेजीचा अंदाज आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते, जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास उत्पादन आणि इन्फ्रामध्ये तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की जी धोरणे सुरू आहेत किंवा बनवली जात आहेत त्यांची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे.

यापैकी गृहनिर्माण, आयुष्मान भारत, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढू शकते. त्याच वेळी, समान नागरी कायदा, सीएए आणि वन नेशन वन इलेक्शन यांसारख्या मोठ्या राजकीय अजेंड्यावर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल म्हणतात की पायाभूत विकास (रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, अंतर्देशीय जलमार्ग, शिपिंग), उत्पादन (भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करणे) यांना मुख्य प्राधान्य असेल. सामाजिक आघाडीवर, पुढील 5 वर्षांसाठी PMGKAY अंतर्गत मोफत रेशन पुरवणे, मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट करून 2 दशलक्ष रुपये करण्याची भाजपची योजना आहे.

आर्थिक प्रस्तावांमध्ये भारताला एक प्रमुख उत्पादन केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, विमान वाहतूक, रेल्वे), डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि एमएसएमईचे सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर असेल.

मोतीलाल ओसवालचे टॉप मिडकॅप शेअर्स: इंडियन हॉटेल्स, गोदरेज प्रॉपर्टीज, ग्लोबल हेल्थ, पीएनबी हाउसिंग, केओईएल, सेलो वर्ल्ड, शोभा, लेमन ट्री हॉटेल, केईआय इंडस्ट्रीज आणि जेके सिमेंट

मोतीलाल ओसवालचे टॉप लार्जकॅप शेअर्स: ICICI बँक, SBI, L&T, TITAN, ITC, HCL टेक, कोल इंडिया, M&M, Zomato आणि Hindalco

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT