Plastic Company sakal
Share Market

Plastic Company : या प्लास्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ, मल्टीबॅगर स्टॉक्सच्या लिस्टमध्ये समावेश...

शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटी, एमपीएल प्लास्टिकचे शेअर्स बीएसईवर 12.38% वाढून 17.25 रुपयांवर बंद झाले. त्यामुळेच आता हा स्टॉक मल्टीबॅगर बनला आहे

सकाळ डिजिटल टीम

MPL Plastics : शेअर बाजार गेल्या सहा दिवसांपासून सलग घसरणीसह बंद होत आहे. मात्र, या घसरणीच्या बाजारातही एमपीएल प्लास्टिकच्या (MPL Plastics) शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटी, एमपीएल प्लास्टिकचे शेअर्स बीएसईवर 12.38% वाढून 17.25 रुपयांवर बंद झाले. त्यामुळेच आता हा स्टॉक मल्टीबॅगर बनला आहे, ज्याने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 103% परतावा दिला आहे.

एमपीएल प्लॅस्टिकच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 18.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत तो सुमारे 31.88 टक्क्यांनी वाढला आहे. एमपीएल प्लॅस्टिक सुमारे 21.56 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली स्मॉलकॅप प्लास्टिक कंपनी आहे.

त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 22.06 रुपये आहे तर त्याची नीचांक 5.54 रुपये आहे. कंपनीचे शेअर्स सध्या 0.24 च्या पीई रेशोवर व्यवहार करत आहेत.

एमपीएल प्लॅस्टिक ही कंपनी मिल्टन या ब्रँड नावाने व्यवसाय करते. देशातील संघटित प्लास्टिक उद्योगातील हा सर्वात जुना ब्रँड आहे. कंपनीने 1972 मध्ये आपला व्यवसाय सुरू केला. पुणे आणि सिल्वासामध्ये कंपनीचे आधुनिक प्लांट आहेत.

सुरुवातीला कंपनी टंबलर, मग, बॉक्स आणि केस यांसारखी उत्पादने तयार करत होती, आता पुढे जात त्यांनी आपला बिझनेस अपग्रेड केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT