Multibagger Stock Orient Green Power share surges 1000 percent in 3 years lic also has stake  Sakal
Share Market

Multibagger Stocks: 'या' स्मॉलकॅप कंपनीत एलआयसीचीही हिस्सेदारी, 3 वर्षात दिला 1,000 टक्के परतावा

Multibagger Stocks: ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचा (Orient Green Power) फोकस सध्या त्यांच्या राइट्स इश्यूचा आकार वाढवण्यावर आहे. ओरिएंट ग्रीन पॉवरच्या बोर्डाने सप्टेंबर तिमाही निकालांच्या घोषणेसह राईट्स इश्यूद्वारे 225 कोटी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती.

राहुल शेळके

Multibagger Stocks: ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचा (Orient Green Power) फोकस सध्या त्यांच्या राइट्स इश्यूचा आकार वाढवण्यावर आहे. ओरिएंट ग्रीन पॉवरच्या बोर्डाने सप्टेंबर तिमाही निकालांच्या घोषणेसह राईट्स इश्यूद्वारे 225 कोटी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, आता या राइट इश्यूचा आकार 300 कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे.

ओरिएंट ग्रीन पॉवरचा शेअर शुक्रवारी एनएसईवर(NSE) 22.30 रुपयांवर बंद झाला. पण त्याने 2023 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जानेवारी 2023 पासून हा शेअर सुमारे 121.01% वाढला आहे. गेल्या 3 वर्षांत या शेअरची किंमत 1,000% पेक्षा जास्त वाढली आहे.

ओरिएंट ग्रीन पॉवर ही अशा काही कंपन्यांपैकी आहे ज्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीनेही (LIC) गुंतवणूक केली आहे. ट्रेंडलाइनवर उपलब्ध आकडेवारीनुसार, एलआयसीकडे या कंपनीचे 15,459,306 शेअर्स अर्थात 1.6 टक्के हिस्सा आहे.

ओरिएंट ग्रीन पॉवर ही स्मॉलकॅप(Small cap) कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2,192 कोटी आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा 32.48% आहे, तर नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्सचा हिस्सा 63.96% आहे. विमा कंपन्या, DII आणि FII कडे उर्वरित 3.56 टक्के हिस्सा आहे.

कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकालही खूपच दमदार होते. ओरिएंट ग्रीन पॉवरचा निव्वळ नफा सप्टेंबरच्या तिमाहीत दुपटीने वाढून 75 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 33.80 कोटी होता. कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 124.10 कोटी झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत108.24 कोटी होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT