Multibagger Stock saksoft ltd share has given more than 7253 percent return in 10 years  Sakal
Share Market

Multibagger Stock: 50 हजाराचे झाले 36 लाख, 10 वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock: शेअर बाजारात कधी कोणता शेअर तुमचे नशीब पालटेल सांगता येत नाही.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर बाजारात कधी कोणता शेअर तुमचे नशीब पालटेल सांगता येत नाही. अनेकदा मजबूत परताव्याची क्षमता असलेला स्टॉक फ्लॉप होतो, तर कधी फ्लॉपसारखा दिसणारा स्टॉक दमदार परतावा देतो.

असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्यावर फोकस कमी असतो पण नेमके तेच शेअर्स भरपूर परतावा देतात. असाच एक स्टॉक आहे सॅकसॉफ्ट लिमिटेडचा (Saksoft ltd). इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सोल्युशन्स कंपनीचा हा स्टॉक 10 वर्षात 7253 टक्क्यांनी वाढला आहे.

सॅकसॉफ्ट लिमिटेडच्या शेअरची किंमत 25 नोव्हेंबर 2013 रोजी 4.77 रुपयांच्या पातळीवर होती. तर 24 नोव्हेंबर 2023 रोजी त्याची किंमत 350.75 रुपये होती. म्हणजेच, गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 7253 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर ही रक्कम 73.53 लाखापेक्षा जास्त झाली असती. जर एखाद्याने केवळ 50 हजार गुंतवले असते, तर ती रक्कम 36 लाखांच्या आसपास असती.

गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 51.5 टक्के आणि वर्षभरात 219 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 66.66 टक्के आहे. तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा 3.96 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा 24.36 टक्के आहे.

सॅकसॉफ्ट लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महसूल 209.39 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 27.85 कोटी होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 56.85 कोटी होता आणि निव्वळ नफा 8.93 कोटी होता.

सॅकसॉफ्ट फिनटेक, लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन, हेल्थटेक आणि युटिलिटी वर्टिकलमधील कंपन्यांना टेक्नोलॉजी सर्व्हिसेज पुरवते. हे त्याच्या ग्राहकांना ऍप्लिकेशन इंजिनीअरिंग, क्वालिटी ऍश्युरन्स अँड टेस्टिंग, डेटा एनालिटिक्स, क्लाउड, इंफ्रास्ट्रक्चर आणि सायबर सिक्युरिटी सपोर्ट देते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT