Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock Update : तीन वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी, रॉकेटच्या वेगाने वाढतोय 'हा' शेअर

24 एप्रिल 2020 रोजी कंपनीचा शेअर फक्त 4.39 रुपयांवर होता

शिल्पा गुजर

Stock Market Update : लॉयड्स मेटल्स एनर्जीच्या (Lloyds Metals Energy) तेजीने मोठा परतावा दिला आहे. त्यांनी अवघ्या तीन वर्षांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 1 कोटी रुपये केलेत.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. त्याच वेळी त्यांनी गेल्या एका वर्षात 247 टक्के परतावा दिला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, त्याची तेजी अजूनही थांबणार नाही आणि ती सध्याच्या पातळीपासून 131 टक्क्यांहून आणखी वाढू शकते.

त्याचे शेअर्स सध्या बीएसईवर 450.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्यामुळेच ब्रोकरेजने पुढील 24 महिन्यांसाठी 1040 रुपयांच्या टारगेटसह खरेदीचे रेटिंग दिले आहे.

लॉयड्स मेटल्स एनर्जीचे शेअर्स 24 एप्रिल 2020 रोजी फक्त 4.39 रुपयांना मिळत होते, जे आता 459.90 रुपयांवर पोहोचले आहेत.

याचा अर्थ लॉयड्स मेटलमधील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या तीन वर्षांत सुमारे 10,153 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात हे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वाढले.

गेल्या वर्षी 25 जुलै 2022 रोजी हे शेअर्स 132.45 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, सुमारे एका वर्षात 247 टक्क्यांहून अधिक वाढले आणि 5 जुलै 2023 रोजी 459.90 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. प्रॉफिट बुकींगमुळे तो या पातळीच्या खाली 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

जून तिमाहीतील कंपनीचा व्यवसाय आतापर्यंतचा सर्वोत्तम होता. एप्रिल-जून 2023 मध्ये, कंपनीच्या लोह खनिजाचे प्रमाण वार्षिक 375 टक्क्यांनी वाढून 3.8 दशलक्ष टन झाले आणि डीआरआय (डायरेक्ट रिड्युस्ड आयर्न) म्हणजेच स्पंज लोहाचे प्रमाण 44.6 टक्क्यांनी वाढून 66,273 टन झाले. याशिवाय, कंपनीने भारताबाहेर आपला व्यवसाय विस्तारत जून तिमाहीत प्रथमच एक्सपोर्ट मार्केटमध्ये प्रवेश केला.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT