Multibagger Stocks Sakal
Share Market

Multibagger Stock Update: 1 लाखाचे झाले 44 लाख, 'या' टेक्सटाईल शेअरची मागच्या 10 वर्षात छप्परफाड कामगिरी

शेअर्सची किंमत 0.76 रुपयांवरून 33.70 रुपयांपर्यंत वाढली आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock Update: ट्रायडंट लिमिटेड (Trident Ltd) या टेक्सटाइल सेक्टरमधील कंपनीने गेल्या 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड असा 4,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

त्याच्या शेअर्सची किंमत या काळात 0.76 रुपयांवरून 33.70 रुपयांपर्यंत वाढली आहे. तुम्ही शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता.

10 वर्षांपूर्वीचा (5 जुलै 2013 रोजी) विचार केल्यास हा शेअर एनएसईवर फक्त 0.76 रुपयांवर ट्रेड होत होता. अशाप्रकारे, गेल्या 10 वर्षांत या शेअरची किंमत सुमारे 4,334% वाढली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याच्या 1 लाख रुपयांची किंमत 44.34 लाख रुपये झाली असती.

ट्रायडेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 0.90% ची किरकोळ वाढ दिसली आहे. गेल्या वर्षभरात त्यात 13 टक्के घट झाली आहे. मात्र, गेल्या 5 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 489.16 टक्के परतावा दिला आहे.

ट्रायडेंट लिमिटेडचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे 17,000 कोटी रुपये आहे. ही कंपनी कापड, कागद, धागा आणि रसायने तयार करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये टॉवेल, गव्हाच्या पेंढ्यापासून बनवलेले प्रिंटिंग पेपर, विणकाम आणि होजरी धागे आणि सल्फ्यूरिक ऍसिड यांचा समावेश आहे. कंपनीला त्याचे बहुतांश उत्पन्न एक्सपोर्टमधून मिळते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

SCROLL FOR NEXT