Nestle India shares drop over 5% to record worst day in 3 years  Sakal
Share Market

Nestle India: गुंतवणूकदार चिंतेत! सरकारच्या कारवाईचा नेस्ले कंपनीला फटका; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

Nestle India Share Price: नेस्लेचे शेअर्स 5.4 टक्क्यांनी घसरून बीएसईवर 2409.55 रुपयांवर पोहोचले आहेत. बहुराष्ट्रीय FMCG कंपन्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूड उत्पादनांमध्ये साखर घालतात असे एका अहवालातून समोर आल्याने ही घसरण दिसून आली आहे.

राहुल शेळके

Nestle India Share Price: नेस्लेचे शेअर्स 5.4 टक्क्यांनी घसरून बीएसईवर 2409.55 रुपयांवर पोहोचले आहेत. बहुराष्ट्रीय FMCG कंपन्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी फूड उत्पादनांमध्ये साखर घालतात असे एका अहवालातून समोर आल्याने ही घसरण दिसून आली आहे.

नेस्लेच्या शेअर्समध्ये एका दिवसात इतकी घसरण होण्याची गेल्या तीन वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे, ज्यामध्ये असे दिसून आले की नेस्ले भारतासारख्या विकसनशील देशात विकल्या जाणाऱ्या बेबी फूड उत्पादनांमध्ये साखर घालते.

स्विस तपास संस्था "पब्लिक आय" आणि IBFANने (इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क) आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या नेस्ले बेबी फूड उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी केली तेव्हा हे उघड झाले.

ही चाचणी बेल्जियममधील प्रयोगशाळेत करण्यात आली. जेव्हा हा वाद समोर आला तेव्हा आरोग्य तज्ञांनी टीका केली. नेस्लेने उत्तर दिले की गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपल्या बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण 30% ने कमी केले आहे.

मॅगीवरही घालण्यात आली होती बंदी

2015 मध्ये, FSSAI या सरकारी संस्थेने, भारतात खाद्यपदार्थांची चाचणी केली होती, नेस्लेच्या मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची चाचणी केली होती. त्या तपासणीत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले.

चौकशीनंतर मॅगीवर बंदी घालण्यात आली. नंतर कंपनीने उत्पादनात सुधारणा केली आणि पुन्हा बाजारात आणली. त्या काळात अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू (FMCG) कंपन्यांनी बाजारात प्रवेश केला होता.

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

नेस्ले इंडियाच्या शेअर्सच्या घसरणीनंतर कंपनीचे मार्केट कॅप 8,137.49 कोटी रुपयांनी घसरून 2,37,447.80 कोटी रुपयांवर आले. याआधी, कंपनीने सांगितले होते की ती आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत खूप जागरूक आहे. गेल्या पाच वर्षांत बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यानंतरच कंपनीचे शेअर्स सावरले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT