Ola Electric first Indian EV maker to file for IPO  Sakal
Share Market

IPO दाखल करणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईक कंपनी ठरणार ओला; 5,500 कोटींचा उभारणार निधी

Ola Electric IPO Update: ओला इलेक्ट्रिकने आयपीओ लॉन्च करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. ओला इलेक्ट्रिक आपला IPO लॉन्च करणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक वाहन कंपनी असेल. IPO द्वारे बाजारातून 10,000 हजार कोटी उभारणार आहे.

राहुल शेळके

Ola Electric IPO Update: ओला इलेक्ट्रिकने आयपीओ लॉन्च करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. ओला इलेक्ट्रिक आपला IPO लॉन्च करणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक वाहन कंपनी असेल. ओला इलेक्ट्रिक IPO द्वारे बाजारातून 5,500 कोटी उभारणार आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिकने आयपीओ लॉन्च करण्याच्या मंजुरीसाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. यासह ओला इलेक्ट्रिक ही पहिली स्वदेशी ईव्ही कंपनी बनेल.

नवीन वर्ष 2024 मध्ये ओला इलेक्ट्रिकचा आगामी IPO हा सर्वात जास्त चर्चेत असलेला IPO असणार आहे. भारतात ऑटोमोबाईल कंपनीचा आयपीओ येण्याची 20 वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. याआधी मारुती सुझुकीने शेवटचा IPO 2003 मध्ये आणला होता.

ओला इलेक्ट्रिकच्या IPO मध्ये नवीन शेअर्स जारी करून 5500 कोटी रुपये उभे केले जातील. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स विकून 1750 कोटी रुपये उभे केले जातील.

म्हणजे विद्यमान भागधारक त्यांचे शेअर्स OFS अंतर्गत विकतील. कोटक, ICICI, बँक ऑफ अमेरिका, Goldman Sachs, SBI Capital, Axis Capital या Ola Electric च्या IPO साठी गुंतवणूक बँका आहेत.

ओला इलेक्ट्रिक जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये IPO लाँच करण्यासाठी रोड शो आयोजित करण्याची योजना आखत आहे. भावीश अग्रवाल हे ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आहेत.

ओला इलेक्ट्रिक ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी आहे जी दरमहा 30,000 ई-स्कूटर विकते. ओला इलेक्ट्रिकचा भर परवडणाऱ्या ई-स्कूटर्सवर आहे. ओला इलेक्ट्रिकला सध्या तोटा सहन करावा लागत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT