PVR-Inox share price shahrukh khans jawan films will rise shares in pvr inox  Sakal
Share Market

Jawan Release: शेअर बाजारतही 'जवान'ची जादू, कंपनीच्या शेअरने 35 मिनिटांत केली कोट्यावधींची कमाई

Jawan Release: शाहरुखच्या जवानची जादू शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

राहुल शेळके

Jawan Release: शाहरुखचा जवान सिनेमा आज सगळीकडे रिलीज झाला. जवान सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आज पहाटेपासुन थिएटरबाहेर गर्दी करत आहेत. जवान सिनेमाची क्रेझ इतकी आहे की थिएटरला स्टेडियमचं रुप आलंय.

थिएटरमधून बाहेर पडताना सर्वजण जवानचे कौतुक करत आहेत. जवानला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. जवानचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले असून, त्यानंतर हा बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

कमाई आणि बुकिंग या दोन्ही बाबतीत शाहरुख खानच्या जवानने या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या पठाणला मागे टाकले आहे. जवानाने बुकिंग करून 14 लाख तिकिटांची विक्री केली होती.

शाहरुखच्या जवानची जादू शेअर बाजारावरही दिसून आली आहे. पीव्हीआर आयनॉक्सच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

जवानाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये एक टक्‍क्‍यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.

सेन्सेक्सच्या आकडेवारीनुसार, दुपारी 1:50 वाजता, शेअरची किंमत 1.20 टक्क्यांच्या वाढीसह 1,849.25 रुपयांवर व्यवहार करत होता. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 1,869 रुपयांवर पोहोचले होते.

35 मिनिटांत 400 कोटींची कमाई

दुपारी 12 वाजता, PVR आयनॉक्सने जवान तिकिटांची विक्री करून 15 कोटींहून अधिक कमाई केली. शेअर बाजारात पीव्हीआर आयनॉक्सने अवघ्या 35 मिनिटांत 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सकाळी 9.50 वाजता कंपनीच्या शेअरने 1,869 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. त्यावेळी पीव्हीआर आयनॉक्सचे मार्केट कॅप 18,267.71 कोटी रुपये होते. एक दिवस आधी बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 17,860.13 कोटी रुपये होते. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या 35 मिनिटांत 407.58 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT