Sensex, Nifty 50 Sakal
Share Market

Share Market Closing: दिवसभरातील घसरणीनंतर बाजार तेजीसह बंद, सेन्सेक्स 72,700च्या वर बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बाजार निर्देशांक वाढीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्स 104 अंकांनी वाढून 72,748 वर पोहोचला. निफ्टी 32 अंकांनी वाढून 22,055 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 March 2024: सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बाजार निर्देशांक वाढीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्स 104 अंकांनी वाढून 72,748 वर पोहोचला. निफ्टी 32 अंकांनी वाढून 22,055 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी ऑटो आणि मेटल क्षेत्रात झाली. तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण दिसून आली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली तर मिडकॅप 100, स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये घसरण झाली.

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये टाटा स्टील, महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो आणि ॲक्सिस बँक यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये इन्फोसिस, टीसीएस, टाटा कंझ्युमर, विप्रो, टायटन आणि एचयूएलच्या शेअर्सचा समावेश होता.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

सोमवारी दिवसभर अदानी समूहाचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. अदानी टोटल गॅसचा शेअर 43 रुपयांनी घसरला आणि 4.34 टक्क्यांच्या घसरणीसह 946 रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आणि तो 30 पैशांनी वाढला आणि 530.5 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी 38,000 कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 18 मार्च रोजी वाढून 378.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 15 मार्च रोजी 378.49 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 38,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 38,000 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने स्टॉकची एक यादी जारी केली आहे ब्रोकरेजला विश्वास आहे की पुढील पाच वर्षांमध्ये 15-25% CAGR परतावा देऊ शकतात. मॅक्रोटेक, ॲक्सिस बँक, मॅक्स हेल्थकेअर आणि अंबरचा समावेश सर्वाधिक तेजीच्या शेअर्समध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT