Sensex, Nifty 50 Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स 454 अंकांच्या वाढीसह बंद; कोणते शेअर्स तेजीत?

buying in stock markets, Sensex closes up 454 points; Which stocks are bullish: मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदीची नोंद झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 वर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 February 2024: मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदीची नोंद झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 वर पोहोचला. निफ्टीही 157 अंकांनी वाढून 21,929 वर बंद झाला. आयटी क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला.

याशिवाय ऑटो, मेटल आणि फार्मा सेक्टरमध्येही खरेदी दिसून आली. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्री दिसून आली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ झाली आहे, तर निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह बंद झाला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांकातही किंचित घसरण झाली तर निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी फार्मा आणि निफ्टी ऑटो निर्देशांक वाढीवर बंद झाले.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स वाढले?

मंगळवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात चांगली वाढ झाली आणि बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, एचसीएल टेक, टीसीएस, मारुती सुझुकी, विप्रो, ओएनजीसी, एसबीआय लाइफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

शेअर बाजारात नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, ब्रिटानिया, इंडसइंड बँक, आयटीसी, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह आणि ॲक्सिस बँक यांचा समावेश होता.

शेअर बाजारात वाढ

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

एसबीआय कार्ड, नवीन फ्लोरिन, यूपीएल, पेटीएम, विनती ऑरगॅनिक्स आणि शारदा क्रॉप कॅमचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते. अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. अदानी विल्मरच्या शेअरमध्ये सर्वात कमी वाढ झाली होती.

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

बाजारातील वाढीमुळे कंपन्यांचे मार्केट कॅप देखील ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 386.97 लाख कोटी रुपये आहे. शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 382.74 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.23 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT