Share Market Closing Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्सची 600 अंकांची उसळी

Share Market Closing: बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे सकाळची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर बँकिंग, फार्मा, मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पुन्हा गती मिळाली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 24 January 2024: बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे सकाळी सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर बँकिंग, फार्मा, मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पुन्हा गती मिळाली. अखेर सेन्सेक्स 689 अंकांनी वाढून 71,060 वर बंद झाला. निफ्टी 215 अंकांनी वधारला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बुधवारी, निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढले तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारात तेजी असलेल्या शेअर्समध्ये हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

S&P BSE SENSEX

शेअर बाजाराच्या अस्थिर व्यवहाराच्या काळात बुधवारी हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये 4.35 टक्क्यांची वाढ झाली, तर डॉ. रेड्डीज आणि टाटा स्टीलचे शेअर्स चार टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. इंडसइंड बँक, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढले.

Share Market Closing 24 January

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

एचसीएल आणि आयडीबीआय बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. यासोबतच मोतीलाल ओसवाल, बोरोसिल रिन्यूअल्स, इंडस टॉवर्स, स्टर्लिंग विल्सन सोलर आणि अलेम्बिक फार्मा यांचे शेअर्सही 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

कॅनरा बँकेचा नफा 3656 कोटी

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचा नफा 29 टक्क्यांनी वाढून 3,656 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा नफा 2,832 कोटी रुपये होता. एकूण उत्पन्न वाढून 32,334 कोटी रुपये झाले आहे.

गुंतवणूकदारांनी 5.53 लाख कोटी रुपये कमावले

बाजारातील तेजीमुळे आज गुंतवणूकदारांचे भांडवल वाढले आहे. काल 23 जानेवारी 2024 रोजी BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 365.98 लाख कोटी रुपये होते.

आज म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी ते 371.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 5.53 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Sugar Season : महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू...

IND vs AUS 1st ODI Live: २५ धावांत ३ विकेट्स! विराट कोहलीला 'गंडवलं', भोपळ्यावर माघारी पाठवलं; शुभमन गिलही परतला Video

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

Kolhapur Sex Worker : कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली, प्रकरणातील नवी अपडेट समोर

Diwali 2025: दिवाळीत पाण्यावरचे दिवे मुलांसाठी धोकादायक, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?

SCROLL FOR NEXT