Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: सलग आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 161 घसरून 61,193 वर, 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरण जाहीर करण्यापूर्वी देशांतर्गत बाजार घसरणीसह बंद झाला

राहुल शेळके

Share Market Closing 3 May 2023: सलग आठ सत्रांपासून सुरू असलेली तेजीला ब्रेक लागला आहे. फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरण जाहीर करण्यापूर्वी देशांतर्गत बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 161 अंकांनी घसरून 61193 वर तर निफ्टी 58 अंकांनी घसरून 18089 वर बंद झाला.

आयटी, मेटल्स, पीएसयू बँक आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली. टॉप-30 सेन्सेक्समध्ये 10 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एशियन पेंट्सला वाढीसह बंद झाले, तर भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा घसरणीसह बंद झाले.

BSE India

शेअर बाजारातील घसरणीचे कारण:

  • कमकुवत जागतिक संकेत बाजारावर दबाव

  • GoFirst च्या दिवाळखोरीच्या वृत्तामुळे वाडिया समूह आणि बँक क्षेत्र दबावाखाली

  • बँक, आयटी, मेटल स्टॉकमध्ये सर्वाधिक दबाव

  • ईडीच्या कारवाईच्या बातम्यांमुळे मणप्पुरमचे शेअर्स दबावाखाली

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअरचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. एफएमसीजी, मीडिया आणि किरकोळ इस्टेट क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात, निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक तेजीसह बंद झाला, स्मॉल कॅप निर्देशांक लाल घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स वधारले तर 31 शेअर्स घसरून बंद झाले. GoFirst Airways ने NCLT मध्ये दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे बँकिंग शेअर्सची विक्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT