Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स 700 अंकांच्या घसरणीसह बंद, आज 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे.

राहुल शेळके

Share Market Closing 5 May 2023: आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. बँकिंग शेअर्सची विक्री आणि बाजारात प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला आहे.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स सुमारे 700 अंकांनी घसरून 61,054 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 187 अंकांनी घसरून 18,069 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स घसरले. त्याचवेळी निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

आजच्या व्यवहारात बँक निफ्टी 2.34 टक्क्यांनी किंवा 1025 अंकांनी घसरून बंद झाला. बँक निफ्टीमुळे बाजारात ही विक्री दिसून आली. याशिवाय आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, एनर्जी, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले. तर ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही नफा बुकिंग झाली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

आजच्या व्यवहारात टायटन 2.46 टक्के, मारुती सुझुकी 1.43 टक्के, नेस्ले 1.36 टक्के, आयटीसी 1.02 टक्के, एशियन पेंट्स 0.98 टक्के वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, एचडीएफसी बँक 5.90 टक्क्यांनी, एचडीएफसी 5.63 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट

आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीला घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 273.76 लाख कोटी रुपये आहे, जे गुरुवारी 275.16 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.40 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT