Share Market Tips google
Share Market

Share Market Tips: या केमिकल शेअरमध्ये तेजीची तज्ज्ञांना विश्वास...

Share Market Tips: डिसेंबर तिमाहीत एथर इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 37.94% वाढून 35.04 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षात 25.4 कोटी होता.

नमिता धुरी

Share Market Tips : एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सध्या गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने स्पेशालिटी केमिकल बनवणाऱ्या एथर इंडस्ट्रीजवर (Aether Industries) बाय (BUY) रेटिंग कायम ठेवले आहे.

तसेच, त्यांनी हा स्टॉक 1,121 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जे सध्याच्या किंमतीपेक्षा 24 टक्क्यांनी अधिक आहे. सध्या हे शेअर्स 905 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीची मार्केट कॅप 11,270 हजार कोटी आहे. हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?? (Share Market: Experts believe in the boom in this chemical share...)

कंपनीची ग्रोथ, आधुनिक आर अँड डी क्षमता, टेक्नोक्रेटिक मॅनेजमेंट, मार्केटमध्ये बहुतांश प्रॉडक्ट्सचे वर्चस्व, मजबूत प्रॉडक्ट पाइपलाइन आणि मजबूत कस्टम बेस यामुळे एथर इंडस्ट्रीजवर बाय रेटींग दिल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.

डिसेंबर तिमाहीत एथर इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 37.94% वाढून 35.04 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षात 25.4 कोटी होता. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीचा महसूल 11% ने वाढून 167.1 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 153.7 कोटी होता.

एथर इंडस्ट्रीजने सौदी अरामको टेक्नॉलॉजीज कंपनीसोबत करार केला आहे. पॉलिओल्स तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट लाइन विकसित आणि व्यावसायिकरण करण्यासाठी हा करार आहे. एथर इंडस्ट्रीजने यासाठी सौदी आरामको टेक्नॉलॉजीजसोबत लेटर ऑफ इंटेंटवर (LoI) स्वाक्षरी केली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT