Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करायची आहे? तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

Share Market Tips: . निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी निफ्टी सपाट उघडला आणि दिवसभर दबावाखाली राहिला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 365.53 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 65322.65 वर बंद झाला आणि निफ्टी 114.80 अंकांनी अर्थात 0.59 टक्क्यांनी घसरून 19428.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी फ्लॅट उघडला आणि दिवसभर दबावाखाली राहिल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी, तो 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह दिवसाच्या खालच्या पातळीवर बंद झाला.

डेली चार्टवर, निफ्टीमध्ये फॉलो-थ्रू विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले. शुक्रवारी तो मागील ट्रेडिंग सत्रात तयार केलेल्या इनसाईड बार पॅटर्नच्या खाली गेला. निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

त्याचे डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर नकारात्मक क्रॉसओवर दाखवत आहेत. इंडेक्समध्ये आणखी कमजोरी येण्याचे हे संकेत आहेत.

निफ्टीला 19350-19290 वर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट तुटला तर त्यात 19100 ची पातळीही दिसू शकते. तर, वरच्या बाजूस, 19530-19500 वर रझिस्टंस आहे.

बँक निफ्टीतही कमजोरीची चिन्हे दिसून आली. मोमेंटम इंडिकेटर्समध्ये नेगिटिव्ह क्रॉसओव्हर आहे. त्यामुळे बँक निफ्टी आणखी कमजोर होण्याची भीती आहे.

बँक निफ्टीची प्राईस आणि मोमेंटम इंडिकेटर्स पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये आणखी घसरणीचे संकेत देत आहेत. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी बँक 44000 च्या दिशेने सरकताना दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT