Share Market Investment Tips
Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 555.95 अंकांनी अर्थात 0.91 टक्क्यांनी वाढून 61749.25 वर बंद झाला, तर निफ्टी 165.95 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी वाढून 18255.80 वर बंद झाला.

एफएमसीजी सोडून सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या चिन्हात बंद झाले. निफ्टीचा एफएमसीजी इंडेक्स 0.13 टक्क्यांनी घसरून बंद झाला. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये सर्वाधिक वाढ झाली, यात 1.55 टक्क्यांनी वाढ दिसली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी गेल्या 8 सत्रांपैकी 7 व्या सत्रात वाढीसह बंद झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. निफ्टीने शुक्रवारी आपला तेजीचा कल कायम ठेवला आहे.

आता पुढे निफ्टीमध्ये आपण लवकरच 18319-18432 ची पातळी पाहू शकतो. तर खाली त्याला 18148 वर निअर टर्म सपोर्ट आहे.

भारतीय इक्विटी मार्केटने अमेरिकन बाजारातील कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करून आपला तेजीचा ट्रेंड सुरू ठेवल्याचे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संतोष मीना म्हणाले.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, यूएस बॉण्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्समुळे भारतासारख्या बाजारांसाठी पॉझिटीव्ही ट्रिगर ठरले.

निफ्टी सध्या 18181-18233 झोनमधील महत्त्वाच्या सपोर्टवर आहे. त्यामुळे आता निफ्टीला आणखी वर जाणे सोपे झाले आहे. पण निफ्टी 18632-18696 वर पोहोचल्यानंतर थोडा थांबू शकतो. तर खाली 18000 हा लाँग टर्म सपोर्ट बनला आहे.

दुसरीकडे, बँक निफ्टीनेही 43,500 वरील रझिस्टंस ओलांडला आहे. आता 44151 च्या ऑल टाईम हायकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाली 43,200–43,000 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • टायटन (TITAN)

  • मारुती (MARUTI)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • एमआरएफ (MRF)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • ट्रेंट (TRENT)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT