Share Market
Share Market Sakal
Share Market

Share Market : आज कोणते 10 शेअर्स असतील अॅक्शनमध्ये? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : बुधवारी 8 मार्चला सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. शेवटी सेन्सेक्स 123.63 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 60348.09 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 42.90 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 17754.40 वर बंद झाला.

बुधवारी सुमारे 1894 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर 1502 शेअर्स घसरून बंद झाले. तर 119 शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. सेन्सेक्स 123 अंकांनी तर निफ्टी 43 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

बँकिंग आणि काही ऑटो कंपन्यांमध्ये खरेदी झाली. तर, रिऍल्टी आणि आयटीमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. कमजोर ओपनिंगनंतर इंडेक्समध्ये चांगली रिकव्हरी झाली.

निफ्टीने खालच्या स्तरावरून 150 हून अधिक अंकांची रिकव्हरी केली. शिवाय निफ्टीने बुलिश कँडल तयार केली आहे जे एक सकारात्मक संकेत आहेत.

आत्तापर्यंत निफ्टी 17700 च्या वर म्हणजेच 20-डे एसएमएवर स्थिर आहे. तोपर्यंत यात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

याच्या वर, निफ्टी 17850-17875 च्या झोनमध्ये फिरताना दिसून येईल. दुसरीकडे, जर निफ्टी 17700 च्या खाली गेला तर विक्रीचा दबाव वाढू शकतो आणि निफ्टी 17600-17550 पर्यंत खाली येऊ शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • एल अँड टी (LT)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • श्रीराम फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT