Share Market
Share Market Sakal
Share Market

Share Market : 'या' IPO शेअरने 10 महिन्यात दिला मोठा परतावा, आणखी वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Share Market : गुजरातमधील स्टेनलेस स्टील पाईप आणि ट्यूब बनवणारी कंपनी व्हिनस पाईप्स अँड ट्यूब्सच्या (Venus Pipes and Tubes Ltd) शेअर्सबाबत ब्रोकरेज हाऊस सकारात्मक आहेत.

व्हीनस पाईप्सचे शेअर्स गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात लिस्ट झाले. लिस्टींगनंतर मागच्या 10 महिन्यात याने 104% मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

त्याची आयपीओ इश्यू प्राईस 326 रुपये होती. तर सध्या हा शेअर 722 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच इश्यू किमतीच्या तुलनेत हा शेअर सुमारे 122 टक्के वाढला आहे.

व्हिनसच्या शेअर्समध्ये येत्या काळात मजबूत तेजी येण्याचा विश्वास नुवामा रिसर्चच्या एनालिस्ट्सने व्यक्त केला आहे. कंपनीची बॅलेन्सशीट मजबूत आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एफसीएफ असूनही हा शेअर चांगली कामगिरी करेल असेही त्यांनी म्हटले.

व्हीनस आपली डायरेक्ट सेल्स वाढवून आणि सीमलेस पाईप्सचा हिस्सा वाढवून नफा सुधारत आहे. वेल्डेड आणि सीमलेस अशा दोन्ही प्रकारासह, कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढवण्याची आशा करतो असे कंपनीने म्हटले आहे.

ब्रोकरेजने व्हिनससाठी 1,024 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार आताच्या किंमतीपासून सुमारे 42 टक्के नफा कमवू शकतात.

व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्स तयार करतात. भारता व्यतिरिक्त ब्राझील, यूके आणि इस्रायलसह 18 देशांमध्ये त्याचा व्यवसाय आहे.

व्हिनस ही भारतातील स्टेनलेस स्टील पाईप आणि ट्यूब उत्पादक आणि निर्यातदार आहे. कंपनी केमिकल, इंजीनिअरिंग, खते, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, ऑईल अँड गॅससह विविध क्षेत्रांना आपली उत्पादने देते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT