Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Opening: सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी; सेन्सेक्स 65,700 पार, Jio Financial ची काय आहे स्थिती?

Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 24 August 2023:

मजबूत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही बाजारात खरेदीचा जोर पाहायला मिळत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 250 हून अधिक अंकांच्या वाढीसह 65,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Jio Financial मध्ये लोअर सर्किट

IT शेअर्स बाजारात आघाडीवर आहेत. टेक महिंद्रा, विप्रोसह इन्फोसिसचे शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले आहेत. आजही Jio Financial मध्ये लोअर सर्किट सेट केले गेले आहे, ज्याची किंमत 215 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Share Market Opening Latest Update 24 August (S&P BSE SENSEX)

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात संरक्षण आणि एरोस्पेसशी संबंधित कंपन्यांमध्ये बरीच वाढ नोंदवली जात होती. बुधवारी संध्याकाळी भारताच्या चांद्रयान 3 च्या यशामुळे एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

संधर टेक्नॉलॉजीजचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये सुमारे 5 टक्क्यांनी वाढले होते तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स 5 टक्क्यांनी खाली आले होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दाखविणाऱ्या शेअर्समध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पारस डिफेन्स, लार्सन अँड टुब्रो, एम टार टेक्नॉलॉजी, मिश्रा धातू निगम लिमिटेड आणि वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे आणि फक्त जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स घसरणीच्या रेड झोनमध्ये दिसत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्स तेजीत आहेत आणि केवळ 2 शेअर्स घसरणीवर आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, टायटन, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक या कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

लिस्टिंगच्या चौथ्या दिवशीही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर कमी होत आहे आणि आजही तो लोअर सर्किटमध्ये आहे. 5 टक्क्यांच्या घसरणीसह, तो प्रति शेअर 215.90 रुपये वर दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT