Share Market update Sakal
Share Market

Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 65,600 च्या जवळ, 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

शेअर बाजारातील अनेक दिवसांची वेगवान तेजी आज ओसरली

राहुल शेळके

Share Market Opening 7 July 2023: शेअर बाजारातील अनेक दिवसांची वेगवान तेजी आज ओसरली आणि सेन्सेक्समध्ये 220 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह व्यवसाय सुरू झाला.

याशिवाय बँक निफ्टी देखील खाली आला आहे आणि निफ्टी देखील 19,450 च्या खाली आहे. आज कमकुवत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात झाली.

आज शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?

BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 226.23 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 65,559.41 च्या पातळीवर उघडला. याशिवाय, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 74.50 अंक किंवा 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 19,422.80 वर उघडला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्समध्ये आज टेक महिंद्राच्या शेअरने सर्वाधिक 1.05 टक्क्यांची घसरण नोंदवली. याशिवाय पॉवरग्रीड, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि सन फार्म घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

टायटनच्या शेअर्समध्ये सेन्सेक्समध्ये तीन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत होती. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल आणि लार्सन अँड टुब्रो हे शेअर वधारत होते.

Share Market Opening 7 July 2023

NSE IX वर, GIFT निफ्टी 61.5 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 19,488 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात नकारात्मक होऊ शकते असे संकेत मिळाले.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 200 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्याचवेळी निफ्टी 19,410 अंकांच्या खाली घसरला.

टोकियोचा शेअर बाजार घसरला

फेड रिझर्व्हच्या व्याजदरात आणखी वाढ आणि मंदीच्या भीतीमुळे गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. त्यामुळे शुक्रवारी जपानच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली.

निक्केई 225 निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 289.28 अंकांनी किंवा 0.88 टक्क्यांनी घसरून 32,483.74 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात गुंड सलमान त्यागीने तुरुंगात घेतला गळफास? चादरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, लॉरेन्स बिश्नोईसाठी करत होता काम

R R Aba Patil यांना वॉचमनची नोकरी नाकारली, पुढे त्यांनी सर्वात मोठी Police Bharti केली! राजकीय किस्सा

Tehran Movie Review: जॉन अब्राहम आणि देशभक्तीचा फॉर्मुला चालला की नाही? ओटीटीवर 'तेहरान' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू वाचा

Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Dharmasthal Temple : धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडले शेकडो मृतदेह; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'काळा डाग लावण्याचा प्रयत्न, हे मोठं षड्‌यंत्र...'

SCROLL FOR NEXT