Share Market
Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स, निफ्टीची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 62600 वर, आयटी-मेटल शेअर्समध्ये खरेदी

राहुल शेळके

Share Market Opening 1 June 2023: देशांतर्गत शेअर बाजाराची गुरुवारी सपाट सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 15.59 अंकांच्या म्हणजेच 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 62,637.83 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 22.65 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 18,557.05 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यापारात कोल इंडियाचा शेअर चार टक्क्यांपर्यंत घसरला. त्याचप्रमाणे भारती एअरटेलमध्ये 3% पर्यंत घसरण दिसून आली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सवर आज सुरुवातीच्या व्यवहारात टेक महिंद्राचा शेअर सर्वाधिक 0.94 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे टीसीएस, एचडीएफसी, विप्रो, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा, एसबीआय, इन्फोसिस यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल 2.90 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक आणि पॉवर ग्रिडमध्येही प्रत्येकी एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होत आहे.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 51.5 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 18,612.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

यातून दलाल स्ट्रीटच्या नकारात्मक सुरुवातीचे संकेत मिळाले. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 30 अंकांची वाढ दिसून आली आणि निफ्टी 18,580 अंकांच्या पुढे व्यवहार करत होता.

तज्ञ काय म्हणतात?

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे यांनी सांगितले की, रात्रीच्या सत्रात अमेरिकन बाजारातील तेजी आणि त्यानंतर आशियाई बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमजोर होण्याची अपेक्षा होती.

अमेरिकेतील कर्ज मर्यादा बिलाच्या मार्गात अडथळे येण्याची भीती कमी झाल्यामुळे बाजारावर त्याचा परिणाम दिसू शकतो. दलाल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या GDP आकड्यांमुळे गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT