Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे बाजारात तेजी; सेन्सेक्स 63,100 वर, मेटल-फार्मा शेअर्सची काय आहे स्थिती?

BSE सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या तेजीसह 63,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 16 June 2023: जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार शुक्रवारी तेजीसह उघडला. BSE सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या तेजीसह 63,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीही 50 अंकांनी वाढून 18,750 च्या जवळ पोहोचला आहे.

मेटल, फार्मा, रियल्टी हे शेअर्स बाजारात खरेदीत आघाडीवर आहेत. डॉ. रेड्डीज, हिंदाल्को आणि डिवीज लॅबचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 310 अंकांनी घसरून 62,917 वर बंद झाला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

आज BSE सेन्सेक्सवर टाटा स्टील 0.97 टक्क्यांनी वाढले, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, टायटन, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि मारुतीचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

आज सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टीसीएस, विप्रो, पॉवरग्रिड आणि एनटीपीसीचे शेअर्स तेजी घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 50 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 18,810.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

काय सांगतात तज्ज्ञ? 

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, यावेळी बाजारावर परिणाम करणारे दोन पैलू आहेत. यातील एक पैलू सकारात्मक आहे तर दुसरा नकारात्मक आहे. अनुकूल जागतिक संकेत ही एक सकारात्मक बाजू आहे. त्याच वेळी, बँक निफ्टीमध्ये घसरण होत आहे ही नकारात्मक बाजू आहे.

सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स नफ्यात आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 6 कंपन्याचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत, तर 22 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT