Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening : शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening 24 March 2023 : संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात सपाट सुरुवात केली.

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडी वाढ झाली आहे. आशियाई बाजारांमध्ये जपानचे निक्केई आणि कोरिया कोस्पी जवळपास अर्धा टक्का घसरणीसह व्यवहार करत आहेत. (Share Market Opening Latest Updates Today 24 March 2023 Bse Nse Sensex Nifty)

त्याचप्रमाणे अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही विक्री होत आहे. काल, कमकुवत जागतिक संकेतांमुळे, सेन्सेक्स 289 अंकांनी घसरून 57,925 वर बंद झाला आणि निफ्टी 75 अंकांनी घसरून 17,076 वर बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्स विक्रीत आघाडीवर होते.

एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स हे शेअर्स निफ्टी घसरले.

सेन्सेक्सच्या 12 शेअर्समध्ये तेजी :

BSE सेन्सेक्समध्ये असलेल्या 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. यामध्ये, इन्फोसिसचा हिस्सा 1 टक्क्यांहून अधिक मजबुतीसह निर्देशांकात अव्वल आहे.

BSE India

'या' शेअर्समध्ये वाढ :

सुरुवातीच्या व्यापारात, बीएसई सेन्सेक्सवर एचसीएल टेकचे शेअर्स 1.64 टक्के, इन्फोसिस 1.56 टक्के, टेक महिंद्रा 1.30 टक्के, टीसीएस 1.26 टक्के, विप्रो 1.08 टक्के, आयटीसी 0.53 टक्के, मारुती 4.4 टक्के वाढले. अँड टुब्रो 0.36 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.24 टक्के, अॅक्सिस बँक 0.21 टक्के, भारती एअरटेल 0.14 टक्के आणि एनटीपीसी 0.11टक्क्यांनी वधारत होते.

'या' शेअर्समध्ये घसरण :

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सची सर्वात मोठी 0.88 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे बजाज फिनसर्व्ह, टायटन, एचडीएफसी, रिलायन्स, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड आणि सन फार्मा लाल रंगात व्यवहार करत होते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: एका फोनने भाषाच बदलली! मुख्यमंत्री फडणवीसांचा पडळकरांना फोन, म्हणाले...

Raj Thackeray: पक्षफुटीनंतर पहिल्यांदा राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद, कानमंत्र देत म्हणाले...

Latest Marathi News Updates : सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

Who is Sanjog Gupta? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फैलावर घेणारे संजोग गुप्ता कोण? जगासमोर शेजाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं अन् लाज काढली...

Delhi University Election Result : दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ‘ABVP’ने पुन्हा एकदा फडकवला भगवा!

SCROLL FOR NEXT