Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: आरबीआयच्या निकाला दिवशी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यापार सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. 4 जूनच्या घसरणीनंतर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आज सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सर्वाधिक वाढ आयटी शेअर्समध्ये झाली.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 7 June 2024: देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये व्यापार सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. 4 जूनच्या घसरणीनंतर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आज सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सर्वाधिक वाढ आयटी शेअर्समध्ये झाली. विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांनी सर्वाधिक वाढ केली. पण मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market Opening

GIFT निफ्टी शुक्रवारी (7 जून) हिरव्या रंगात व्यवहार करत होता. निर्देशांक 22,900 च्या वर जात होता. अमेरिकन फ्युचर्स मार्केटही हिरवेगार होते. आज व्याजदरांबाबतचा निर्णयही केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून येणार आहे. चलनविषयक धोरण समितीची बैठक 5-7 जून रोजी होत आहे. RBI गव्हर्नर सकाळी 10 वाजता यावर निर्णय देणार आहेत.

Share Market Opening

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर 6 शेअर्समध्ये घसरण होत आहे. विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस सारखे आयटी शेअर्स बाजारातील अव्वल लाभधारक आहेत. याशिवाय टाटा मोटर्ससह टाटा स्टील, बजाज फायनान्स, टायटन आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स वाढत आहेत.

BSE SENSEX

निफ्टी शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्स वाढीसह तर 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीमध्येही आयटी शेअर्स सर्वाधिक तेजीत आहे आणि विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एलटीआय माइंडट्री शेअर्स वाढत आहेत.

BSEचे मार्केट कॅप

बीएसईचे बाजार मार्केट कॅप 418.58 लाख कोटी रुपये झाले आहे. बीएसईमध्ये 2847 शेअर्सवर ट्रेड होत असून त्यापैकी 2175 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. 584 शेअर्स घसरले आहेत आणि 88 शेअर्स अपरिवर्तित आहेत. 86 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 28 शेअर्सवर लोअर सर्किट लावण्यात आले आहे. 70 शेअर्स एक वर्षाच्या उच्चांकावर आहेत आणि 17 शेअर्स 52 आठवड्यांच्या घसरणीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

Patna hospital firing Video: अगदी 'फिल्मी'स्टाइलने ते पाचजण बंदूक घेवून रूग्णालयात शिरले, अन् काही क्षणातच..!

हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल तरक आहारात करा 'हा' बदल

SL vs BAN: W,W,W,W... अकरा धावांत ४ विकेट्स! बांगलादेशी गोलंदाजाने मोडला हरभजन सिंगचा १३ वर्षे जुना विक्रम

Solapur Zilla Parishad Leadership: कर्मचारी नेत्यांची सोलापूर जिल्हा परिषदेत मोठी पोकळी; नव्या नेतृत्वाचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT