stock market crash Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार 2,222 अंकांनी आपटला; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Share Market Closing Today: सोमवार (5 ऑगस्ट) हा दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रचंड घसरणीचा ठरला. जागतिक बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आणि शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. इंट्राडे मध्ये, निफ्टी 24000 च्या खाली तर सेन्सेक्स 78,300 पर्यंत घसरला होता.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 5 August 2024: सोमवार (5 ऑगस्ट) हा दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रचंड घसरणीचा ठरला. जागतिक बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आणि शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. इंट्राडे मध्ये, निफ्टी 24000 च्या खाली तर सेन्सेक्स 78,300 पर्यंत घसरला होता. बंद होताना निफ्टी 662 अंकांनी घसरून 24052 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 2222 अंकांनी घसरून 78760 वर बंद झाला.

निफ्टी बँक 1258 अंकांनी घसरून 50100 च्या जवळ बंद झाला. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. आज इंडिया VIX, जो बाजाराची अस्थिरता दर्शवतो तो जवळजवळ 50% वर गेला होता. जागतिक बाजारात अमेरिकेत मंदीच्या भीतीने आणि जपानमध्ये येन कॅरी ट्रेड बंद झाल्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली.

Share Market Closing

PSU शेअर्समध्ये नफा बुकिंग

बाजारातील या घसरणीमुळे भारत फोर्ज 6.18 टक्के, मदरसन 9.18 टक्के, एलआयसी हाऊसिंग फायनान्स 8.34 टक्के, टाटा मोटर्स 7.31 टक्के, एमफेसिस 4.43 टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स 4.19 टक्के, हिंदुस्थान कॉपर 6.71 टक्के, नोल्को 6.62 टक्के, ओएनजीसी 6.01 टक्के, जीएमआर एयरपोर्ट 5.61 टक्क्यांनी घसरले.

Share Market Closing

गुंतवणूकदारांचे 15.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 5 ऑगस्ट रोजी 441.66 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी 457.16 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे फक्त 2 शेअर्स तेजीत

शेअर बाजारातील घसरण इतकी तीव्र होती की सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 2 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चा शेअर 0.97 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि नेस्ले इंडियाचा शेअर (Nestle India) 0.75 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्समधील उर्वरित 28 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सचे शेअर सर्वाधिक 7.38 टक्के घसरले. याशिवाय अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT