Share Market Updates  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर; निफ्टी प्रथमच 22240च्या वर, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: बुधवारी शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचला. निफ्टी प्रथमच 22,240 च्या वर उघडला. सेन्सेक्स 73,000 च्या पुढे व्यवहार करत आहे. बाजाराच्या तेजीत PSU बँकिंग, मेटल आणि वाहन क्षेत्रांचा समावेश आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 February 2024:

बुधवारी शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचला. निफ्टी प्रथमच 22,240 च्या वर उघडला. सेन्सेक्स 73,000 च्या पुढे व्यवहार करत आहे. बाजाराच्या तेजीत PSU बँकिंग, मेटल आणि वाहन क्षेत्रांचा समावेश आहे. तर आयटी आणि मीडिया क्षेत्रात विक्री होत आहे. हिंदाल्को निफ्टीमध्ये सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर आहे, तर इन्फोसिस आणि टीसीएस टॉप लूसर आहेत. (Nifty opens at fresh all-time high)

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक निर्देशांक तेजीत होते तर निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. बुधवारी निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही वाढ झाली. (Share Market Today Nifty opens at record high, Sensex flat; Hindalco zooms 3 percent)

सेन्सेक्स 73,000 च्या पुढे व्यवहार करत आहे

कोणते शेअर्स तेजीत

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर एनटीपीसी, कोल इंडिया, बजाज ऑटो आणि आयशर मोटर्सचे शेअर्स वधारत होते.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह तर 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्समध्ये वाढ तर 19 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

दलाल स्ट्रीट सतत नवनवीन विक्रमांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निफ्टीने 22,216 चा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे तर सेन्सेक्सने 73,000 चा टप्पा ओलांडला आहे. 2024 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि भाजपचा विजय झाल्यास शेअर बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे.

झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले (Zee Entertainment)

बुधवारी झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले. शेअर इंट्राडे 15 टक्क्यांनी घसरला आणि 163.75 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. सेबीला कंपनीच्या फायलींमध्ये 2,000 कोटी रुपयांची तफावत आढळल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, सेबीला झीच्या संस्थापकांच्या चौकशीत सुमारे 2,000 कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाल्याचे आढळले आहे.

देवयानी इंटरनॅशनलचे शेअर्स 5.5% पेक्षा जास्त वाढले

देवयानी इंटरनॅशनल शेअर्स बुधवारी 5.58% वाढून 175 रुपयांच्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचले. प्री-मार्केटमधील मोठ्या डीलनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. प्री-मार्केट डीलमध्ये 5.23 कोटी रुपये म्हणजेच 4.3% इक्विटीचे व्यवहार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT