Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: 3 दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार सपाट बंद; सेन्सेक्स 72,987 वर, एफआयआयची मोठी विक्री

Share Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर तीव्र चढउतार पाहिल्यानंतर सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजार पुन्हा लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 118 अंकांनी घसरला आणि 72,987 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 15 May 2024: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर तीव्र चढउतार पाहिल्यानंतर सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजार पुन्हा लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 118 अंकांनी घसरला आणि 72,987 वर बंद झाला.

निफ्टी 17 अंकांनी घसरून 22,200 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 172 अंकांनी घसरून 47,687 वर बंद झाला. कमोडिटी मार्केटमध्ये रुपया 1 पैशांनी मजबूत झाला आणि 83.50 रुपयांवर बंद झाला. बाजार हिरव्या रंगात उघडले परंतु व्यापारादरम्यान ते उच्च पातळीपासून घसरायला लागले.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात एनर्जी, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मजबूत वाढ दिसून आली आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 482 अंकांच्या उसळीसह 50707 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Today

विदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर विक्री

भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमी जागा मिळू शकतात, अशी भीती शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्स विकणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत आधीच्या अंदाजाच्या तुलनेत कमी जागा मिळणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत शेअर बाजारात असेच चढ-उतार पाहायला मिळतील, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

S&P BSE SENSEX

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये कोल इंडिया लिमिटेड, सिप्ला, बीपीसीएल, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि महिंद्रा यांचे शेअर्स होते.

तर टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. युरोपीय शेअर बाजार बुधवारी सकारात्मक पद्धतीने सुरू झाले. अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीचा व्याजदरावर परिणाम झाल्यामुळे युरोपीय शेअर बाजारांमध्ये तेजी होती.

मार्केट कॅपमध्ये 2.50 लाख कोटींची वाढ

आजच्या व्यवहाराच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी बीएसईवर असलेल्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली आहे. बीएसईचे मार्केट कॅप 404.37 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे गेल्या सत्रात 401.90 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 2.47 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT