Share Market Today Sensex, Nifty jump at open as global sentiment improves, Asian markets firm up  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्सने घेतली 400 अंकांची उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात झाली आहे. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक वाढीसह उघडले. सेन्सेक्स 73,550 वर व्यवहार करत आहे. निफ्टीही 150 अंकांच्या उसळीसह 22,300 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 22 April 2024 (Marathi News):

शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात झाली आहे. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक वाढीसह उघडले. सेन्सेक्स 73,550 वर व्यवहार करत आहे. निफ्टीही 150 अंकांच्या उसळीसह 22,300च्या जवळ व्यवहार करत आहे. मेटल, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे.

Share Market Opening

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये बीपीसीएल, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन, बजाज फायनान्स, डिव्हिस लॅब आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स होते. तर घसरणाऱ्या शेअर्समध्ये जीएसपीएल, रामकृष्ण फोर्जिंग, सन फार्मा, व्होडाफोन आयडिया, मदरसन सुमी, यांचा समावेश होता.

Share Market Opening

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती?

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ओएनजीसीसह कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, विप्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस आणि टीसीएस यांचे शेअर्स तेजीत आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली.

आशियाई शेअर बाजारांनी सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात एचडीएफसी बँक आणि विप्रोच्या उत्कृष्ट निकालांमुळे सोमवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकातही वाढ अपेक्षित होती. रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या बड्या कंपन्यांचे निकाल आज सोमवारी लागणार आहेत, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष या निकालाकडे असणार आहे.

S&P BSE SENSEX

बीएसईचे मार्केट कॅप

आज बीएसईचे मार्केट कॅप 402 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. आज बीएसईवर 3132 शेअर्सचे व्यवहार होत आहेत आणि त्यापैकी 2424 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 588 शेअर्समध्ये घसरण झाली असून 120 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

136 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर व्यवहार करताना दिसत आहेत आणि 7 शेअर्स 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर व्यवहार करताना दिसत आहेत. 171 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 55 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT