Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: बाजार उघडताच नवीन विक्रम, सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजार नव्या विक्रमी पातळीवर उघडला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 72,281 आणि निफ्टीने 21,728 च्या पातळीला स्पर्श केला. तसेच, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजाराने 362.70 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 28 December 2023:

गुरुवारी शेअर बाजार नव्या विक्रमी पातळीवर उघडला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 72,281 आणि निफ्टीने 21,728 च्या पातळीला स्पर्श केला. तसेच, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजाराने 362.70 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये बाजारात सर्वाधिक खरेदी झाली आहे. निफ्टीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील आणि एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत, तर ब्रिटानियाला सर्वाधिक नुकसान झाले आहे.

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात चांगली वाढ झाली. शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, बीपीसीएल आणि एसबीआय लाइफचे शेअर्स आहेत तर अॅक्सिस बँक, इन्फोसिस, बजाज ऑटो आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ब्रँड कॉन्सेप्ट, युनि पार्ट्स इंडिया, देवयानी इंटरनॅशनल आणि पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, साऊथ इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ऑइल, सर्व्होटेक पॉवर, बंधन बँक, आयटीसी लिमिटेड, गेल इंडिया, कॅम्बाउंड केमिकल, बीसीएल इंडस्ट्रीज, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, वोक्हार्ट लिमिटेड, डीपी वायर्स यांचे शेअर्स तेजीत आहेत.

अमेरिकन बाजारातही तेजी

जागतिक आघाडीवरील तेजीचा देशांतर्गत बाजारालाही पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन बाजारातील तेजीचा कल बुधवारीही कायम राहिला. डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल सरासरी 0.30 टक्क्यांनी वाढण्यात यशस्वी ठरला. S&P 500 0.14 टक्क्यांनी आणि Nasdaq Composite Index 0.16 टक्क्यांनी वर होता.

आशियाई बाजार तेजीत

सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई सुमारे 0.40 टक्क्यांनी घसरला आहे, परंतु इतर प्रमुख आशियाई बाजार वाढत आहेत. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.30 टक्क्यांनी वधारत आहे. तर हाँगकाँगचा हँगसेंग दीड टक्क्यांहून अधिक तेजीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT