Share Market Updates Sensex, Nifty open in the red, led by mixed signals from global markets Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 350 अंकांनी खाली, कोणत्या क्षेत्रात तेजी?

Sensex-Nifty Today: जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात विक्री होत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरून 72,600 वर आणि निफ्टी 40 अंकांनी घसरल्यानंतर 22000 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 26 March 2024 (Marathi News):

जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात विक्री होत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्स 350 अंकांनी घसरून 72,600 वर आणि निफ्टी 40 अंकांनी घसरल्यानंतर 22000 च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्री होत आहे. तर ऑटो, मेटल आणि आयटी क्षेत्रात खरेदी होत आहे.

कोणते शेअर्स वाढले?

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रानंतर आयटी शेअर्सवर आज पुन्हा विक्रीचा दबाव आहे. इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स घसरणीसह उघडले, तर आयटीमध्ये, एचसीएल आणि विप्रोचे शेअर्स वाढीसह उघडले.

Sensex Today

एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक यांचे शेअर्स वाढीसह उघडले तर बीपीएसीएल, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल सारखे शेअर्स घसरले.

बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण

बँक निफ्टी आज 310.80 अंक किंवा 0.66 टक्क्यांच्या घसरणीसह 46,552 च्या वर उघडला आणि बँक निफ्टीचे अर्ध्याहून अधिक शेअर्स घसरणीसह उघडले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्समध्ये वाढ तर 17 शेअर्स घसरत आहेत. 50 निफ्टी शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 28 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Nifty Today

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7061 कोटी रुपयांची घसरण

22 मार्च 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,82,29,844.07 कोटी होते. आज म्हणजेच 26 मार्च 2024 रोजी बाजार उघडताच तो 3,82,22,783.04 कोटी रुपयांवर राहिला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 7061.03 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

S&P BSE SENSEX

इंडिगोचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर

इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स मंगळवारी 2% पेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत. कंपनीचे शेअर्स 2.15% वाढून 3,357.50 च्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचले.

शेअर्ससाठी हा विक्रमी उच्चांक आहे. ब्रोकरेजकडून सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. ब्रोकरेज सिटी रिसर्च आणि मॉर्गन स्टॅनले यांनी स्टॉकवर त्यांचे मत मांडले आहे.

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत असणार?

अल्ट्राटेक सिमेंट: कंपनीने उत्तराखंड युनिटमध्ये 1 MTPA ब्राऊनफिल्ड सिमेंट क्षमता वाढवली आहे. आता युनिटची क्षमता 2.1 एमटीपीए झाली आहे.

संघी इंडस्ट्रीज: प्रवर्तक अंबुजा सिमेंटने कंपनीतील आपला 2% हिस्सा 258 कोटी रुपयांना विकला आहे. आता कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 60.44% आहे.

रेमंड: बोर्डाने संपूर्ण मालकीची उपकंपनी Raymond Apparel आणि Ultrastores Realty मधील आपली संपूर्ण गुंतवणूक 1.26 कोटी रुपयांना विकण्याची परवानगी दिली आहे.

मारुती सुझुकी इंडिया: कंपनीने बलेनोच्या 11,185 युनिट्स आणि वॅगन आरच्या 4,190 युनिट्स परत मागवल्या आहेत. कंपनीने Amlgo Labs मधील 6.44% स्टेक 1.99 कोटी रुपयांना विकत घेण्याचेही मान्य केले आहे.

Bharti Airtel: गुरुग्राम कर प्राधिकरणाने कमी कर भरल्यामुळे कंपनीला 114 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT