Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा घसरला; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 71000 आणि निफ्टी 21,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 25 January 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 71000 आणि निफ्टी 21,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक घसरण आयटी आणि फार्मा क्षेत्रात झाली. निफ्टीमध्ये टेक महिंद्रा 5%च्या घसरणीसह टॉप लूसर आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली तर निफ्टी आयटी घसरणीसह व्यवहार करत होते.

आज शेअर बाजारात हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर डॉ रेड्डीज, टाटा स्टील, एचसीएल टेकचे शेअर्स घसरणीसह उघडले. आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले होते, तर एशियन पेंट्स आणि अदानी पोर्ट्समध्ये किंचित वाढ झाली.

S&P BSE SENSEX

शेअर बाजार विश्लेषकांचा अंदाज

शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की भारतीय शेअर बाजाराचे मूल्यांकन वाढल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार नफा कमावत आहेत. यासोबतच तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांमुळे शेअर बाजारात विक्री आणि नफा बुकिंग दिसू शकते.

शेअर बाजारात घसरण (BSE)

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मल्टीबॅगर शेअर्समध्ये ब्रँड कॉन्सेप्ट, एनएमडीसी, पटेल इंजिनीअरिंग, एचडीएफसी लाइफ, ग्लोबस स्पिरिट, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, जिओ फायनान्शियल, युनि पार्ट्स इंडिया, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, कोटक महिंद्रा आणि नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, देवयानी, कामधेनू आणि ओम इन्फ्रा यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

अदानी समूहाचे शेअर्स

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर्स दोन टक्क्यांनी वधारले तर अदानी टोटल गॅस किंचित वाढीसह व्यवहार करत होते.

आज शेअर बाजारातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांच्या नजरा वेदांत, टाटा टेक, एसबीआय लाइफ आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सवर आहेत कारण या कंपन्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.

मझगांव डॉकमध्ये 6.5% ने वाढ

Mazagon Dock Shipbuildersमध्ये 6.5% ची वाढ झाली आणि शेअर्स 2,477.70 च्या उच्चांकावर पोहोचला. संरक्षण मंत्रालयाकडून 1,070 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

कंपनीने भारतीय तटरक्षक दलासाठी 14 जहाजे पुरवण्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत 1,070 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT