Share Market Today Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 1,000 अंकांनी वधारला, निफ्टी 24,300 च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: जर आपण आजच्या संकेतांबद्दल बोललो, तर आज मंगळवारी (6 ऑगस्ट) जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात वाढ झाली आहे, जी दिलासा देणारी बाब आहे. गिफ्ट निफ्टी 183 अंकांनी वर आहे आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील तेजीत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 6 August 2024: खराब जागतिक संकेतांमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. जगभरातील बाजारपेठा घसरल्या होत्या. जर आपण आजच्या संकेतांबद्दल बोललो, तर आज मंगळवारी (6 ऑगस्ट) जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात वाढ झाली आहे, जी दिलासा देणारी बाब आहे. गिफ्ट निफ्टी 183 अंकांनी वर आहे आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील तेजीत आहे.

Share Market Opening

आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 950 अंकांच्या वर तर निफ्टी देखील 250 अंकांच्या वर उघडला. बँक निफ्टीमध्ये सुमारे 470 अंकांची वाढ दिसून आली आहे. पॉवर आणि मेटल शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे.

Share Market Opening

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7.27 लाख कोटींची वाढ

5 ऑगस्ट 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,41,84,150.03 कोटी होते. आज म्हणजेच 6 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,49,11,923.25 कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 7,27,773.22 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सचे सर्व शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, ते सर्व शअर्स तेजीत आहेत. टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि एनटीपीसीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. आज BSE वर 2711 शेअर्सची खरेदी-विक्री होत आहे.

यामध्ये 2046 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 529 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 136 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 88 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 10 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 97 शेअर्स अप्पर सर्किटवर तर 49 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्समध्ये वाढ

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे आणि टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक 3.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ONGC मध्ये 2.98 टक्के आणि L&T मध्ये 2.89 टक्के वाढ आहे. JSW स्टील 2.31 टक्क्यांनी तर मारुती 2.31 टक्क्यांनी वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT