Stock Market Opening Today Sakal
Share Market

Stock Market Opening: सेन्सेक्स 327 अंकांच्या वाढीसह उघडला; झोमॅटोमध्ये जोरदर तेजी, कोणते शेअर्स वधारले?

Stock Market Opening Today: आज (मंगळवारी) शेअर बाजारात जोरदार तेजीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सने 327 अंकांच्या वाढीसह 82,527 वर व्यापारास सुरुवात केली. निफ्टीही 76 अंकांनी वाढत 25,166 वर उघडला.

राहुल शेळके

  1. DIIs च्या मोठ्या खरेदीमुळे आणि FIIs च्या कमी विक्रीमुळे बाजारात तेजी.

  2. सोन्या-चांदीने विक्रमी वाढ करत भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

  3. Titan च्या आंतरराष्ट्रीय डीलसह अनेक कंपन्यांच्या निकालांवर बाजाराची नजर.

Stock Market Opening Today: आज (मंगळवारी) शेअर बाजारात जोरदार तेजीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सने 327 अंकांच्या वाढीसह 82,527 वर व्यापारास सुरुवात केली. निफ्टीही 76 अंकांनी वाढत 25,166 वर उघडला, तर बँक निफ्टी 301 अंकांनी वाढून 57,253 वर पोहोचला.

सुरुवातीच्या व्यवहारात ईटरनलच्या शेअर्समध्ये तब्बल 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉककडे वळले आहे. दरम्यान, चलन बाजारात रुपया 8 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत 86.26 वर उघडला.

Stock Market Opening Today

सेक्टोरल निर्देशांकांकडे पाहिल्यास, ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्रात घसरण होताना दिसत आहे. मात्र, मेटल, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीचा जोर आहे. बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.

Stock Market Opening Today

आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स

आज शेअर बाजारात ETERNAL, TRENT, TATASTEEL, TITAN, BEL हे शेअर्स वाढले तर SUNPHARMA, INFY, BAJFINANCE, TATAMOTORS, BAJAJFINSV हे शेअर्स घसरले आहेत. तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) केवळ 1,400 कोटींची विक्री केली, जी अलीकडच्या काळातील सर्वात कमी विक्री होती. उलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) तब्बल 3,600 कोटींची खरेदी केली, ज्यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे.

Stock Market Opening Today

भारत-अमेरिका ट्रेड डील

भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डीलची चर्चा सध्या स्थगित झाली आहे. 1 ऑगस्टपूर्वी काही निष्कर्ष निघण्याची शक्यता कमी आहे. सहावा टप्पा आता ऑगस्टमध्ये भारतात होणार असून, सवलती, डिजिटल ट्रेड आणि कृषी आयातीवर चर्चा होणार आहे.

अमेरिकन बाजारांकडून सकारात्मक संकेत

Nasdaq ने सलग सहाव्या दिवशी 80 अंकांनी वाढ घेत उच्चांक गाठला. S&P 500 नेही नवा विक्रम केला, तर Dow Jones 300 अंकांनी घसरणीसह बंद झाला. GIFT निफ्टी 60 अंकांनी वाढून 25,200 जवळ व्यापार करत आहे, तर Dow Futures 75 अंकांनी आणि Nikkei 175 अंकांनी वाढत आहे. हे जागतिक संकेत भारतीय बाजारासाठी सकारात्मक ठरत आहेत.

कंपन्यांच्या हालचालींवर बाजाराचे लक्ष

PNB Housing ने उत्तम तिमाही निकाल जाहीर केले, मात्र Oberoi Realty चे निकाल अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. आज F&O सेगमेंटमधील Paytm, Dixon Tech, KEI Industries, MGL आणि IRFC यांसारख्या आठ कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. Titan ने दुबईच्या Damas LLC मध्ये 67% हिस्सेदारी घेण्यासाठी 2,440 कोटींचा करार केला आहे. या डीलमुळे Titan चा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणखी बळकट होईल.

आज शेअर बाजारात तेजी का आहे? (Why did the stock market rise today?)

-बाजारातील तेजीमागील मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत फंड्स (DIIs) ने मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) कमी विक्री केली.

भारत-अमेरिका ट्रेड डील का थांबली आहे? (Why has the India-US trade deal stalled?)

- डिजिटल ट्रेड आणि कृषी आयात यावर एकमत न झाल्यामुळे सध्या ट्रेड डील थांबवली आहे.

Titan ची Damas LLC डील गुंतवणूकदारांसाठी किती महत्त्वाची आहे? (How significant is Titan’s Damas LLC deal for investors?)

- ही डील Titan च्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी महत्त्वाची असून, यामुळे कंपनीची कमाई वाढू शकते.

आज कोणत्या कंपन्यांचे निकाल येणार? (Which companies’ results can impact the market today?)

- Paytm, Dixon Tech, KEI Industries, MGL, IRFC आणि इतर 8 कंपन्यांचे निकाल आज बाजाराच्या हालचालींवर परिणाम करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधणाला मिळणार डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार?

Chandrakant Patil : शिक्षकांनी गुरूंचे स्थान उंचावले पाहिजे, चंद्रकांत पाटील यांचे मत; विकसित भारताबाबत परिसंवाद

Solapur Crime: साडेतीन लाखांचे दागिने शेटफळ येथून लंपास; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

Incense Smoke Harmful : अगरबत्तीचा धूर सिगारेटपेक्षा अधिक धोकादायक; धडकी भरवणारा रिसर्च समोर, कॅन्सरच्या धोक्याचीही शक्यता!

Latest Maharashtra News Updates : मुंबईत पहाटेपासून पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT