Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार प्रॉफिट बुकिंगचा बळी, सेन्सेक्स 72150 वर बंद, आयटी शेअर्सवर दबाव

Share Market Closing Latest Update 7 February 2024: बुधवारी शेअर बाजारात प्रॉफिट बुकींग झाली. त्यामुळे जोरदार सुरुवात होऊनही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 35 अंकांनी घसरून 72,150 वर आला,

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 7 February 2024: बुधवारी शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग झाली. त्यामुळे जोरदार सुरुवात होऊनही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 35 अंकांनी घसरून 72,150 वर आला, ज्याने 72,559चा उच्चांक गाठला होता. निफ्टी 22,053 वरून 21,930 वर घसरला. आयटी शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव होता.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात पुन्हा एकदा मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. निफ्टी मिड कॅप निर्देशांक 49,430 अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला तर स्मॉल कॅप निर्देशांक 16,653 अंकांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला.

याशिवाय बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, ऊर्जा, हेल्थकेअर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्सही वाढीसह बंद झाले. तर ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

निर्देशांक घसरणीसह बंद

शेअर बाजारात कोणते शेअर्स घसरले?

बुधवारी शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. टेक महिंद्रा आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि विप्रोचे शेअर्सही शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत होते.

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये एसबीआय, सन फार्मा, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीचा भारतीय कंपन्यांमधील हिस्सा आता 3.64 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 31 डिसेंबर रोजी शेअर बाजारातील कंपन्यांमधील एलआयसीचा हिस्सा 3.64 टक्क्यांपर्यंत घसरला होता. सप्टेंबरच्या तिमाहीत तो 3.73 टक्के होता.

शेअर बाजारात कोणते शेअर्स वाढले?

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

बुधवारी शेअर बाजाराच्या व्यवहारादरम्यान, अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 8 शेअर्समध्ये वाढ झाली, तर एसीसी लिमिटेड आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात मुथूट फायनान्स, एसबीआय कार्ड, ॲक्सिस बँक, पतंजली फूड्स, बजाज फायनान्स, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

आजच्या सत्रात शेअर बाजारात कंपन्यांच्या मार्केट कॅपने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवरील कंपन्यांचे मार्केट कॅप 389.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचले जे मागील सत्रात 386.83 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT