Share Market Closing Latest Update Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; मिड-स्मॉल कॅपमध्ये पुन्हा वाढ, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Today: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी वाढीसह बंद झाले. NSE निफ्टी 148 अंकांनी वाढून 22146 च्या पातळीवर बंद झाला तर BSE सेन्सेक्स 335 अंकांच्या वाढीसह 73097 च्या पातळीवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 14 March 2024: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी वाढीसह बंद झाले. NSE निफ्टी 148 अंकांनी वाढून 22146 च्या पातळीवर बंद झाला तर BSE सेन्सेक्स 335 अंकांच्या वाढीसह 73097 च्या पातळीवर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी, फार्मा आणि मेटल क्षेत्रात झाली. तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात विक्री झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

गुरुवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाली. अनेक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुरुवारी 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुरुवारी, शेअर बाजाराच्या अस्थिर व्यापाराच्या काळात, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले.

Share Market Closing

निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला, तर बीएसई स्मॉल कॅप तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला.निफ्टी आयटी दोन टक्क्यांनी तर निफ्टी ऑटो एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

Share Market Closing

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील वाढीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि कोल इंडियाचे शेअर्स समाविष्ट होता, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, ITC, जेएसडब्ल्यू स्टील यांचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

गुरुवारी शेअर बाजारात अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी पॉवर 2.73 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर अदानी टोटल गॅस सुमारे 11 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. अदानी समूहाचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. कंपन्यांच्या शेअर्सनी इंट्राडेमध्ये 15.5 लाख कोटींच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला.

गुंतवणूकदारांनी कमावले 8 लाख कोटी

गुरुवारच्या सत्रात शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 380.16 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 372.11 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

निवडणुकीच्या निकालादरम्यान बाजारात गोंधळाची शक्यता

बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. व्हॅल्यू स्टॉक्सचे शैलेश सराफ यांच्या मते, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर बाजारात अस्थिर स्थिती निर्माण होऊ शकते. पण दीर्घकालीन बाजारात तेजी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT