stock to buy ems ltd in share market by sandeep jain stock name Saka
Share Market

Stock to Buy: 'या' स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत दिला 80 टक्के परतावा; आणखी वाढीचा तज्ज्ञांना अंदाज

Stock to Buy: शेअर बाजारात चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. शेअर बाजारात घसरणीच्या काळात हेच चांगले शेअर्स तग धरुन असतात आणि तुमचं नुकसान होऊ देत नाही. पण चांगले शेअर्स निवडणं हे अवघड काम आहे.

राहुल शेळके

Stock to Buy: शेअर बाजारात चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. शेअर बाजारात घसरणीच्या काळात हेच चांगले शेअर्स तग धरुन असतात आणि तुमचं नुकसान होऊ देत नाही. पण चांगले शेअर्स निवडणं हे अवघड काम आहे.

यासाठीच शेअर बाजारातील तज्ज्ञ आपल्याला मदत करतात. अशात बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी चांगला स्टॉक निवडला आहे आणि त्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये कमी आणि जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी इएमएस लिमिटेड (EMS Ltd) या शेअरची निवड आहे. तज्ज्ञांनी या शेअरला अनेक वेळा बाय रेटिंग दिले आहे. हा स्टॉक वरच्या लेव्हलवरुन करेक्ट होऊन आता 529 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. हा शेअर शॉर्ट ते लॉन्ग टर्मच्या गुंतवणुकीसाठी खरेदी करता येऊ शकतो. (stock to buy ems ltd in share market by sandeep jain stock name)

इएमएस लिमिटेड (EMS Ltd)
सीएमपी (CMP) - 529 रुपये
टारगेट (Target)- 590 रुपये

इएमएस लिमिटेड (EMS Ltd) ही कंपनी 1988 पासून कार्यरत आहे. या कंपनीने बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरवला आहे. अलीकडेच कंपनीने कर्जही कमी केल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कंपनीचे फंडामेटल्स मजबूत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी या शेअरला बाय रेटींग दिले आहे.

कंपनीचा  रिटर्न ऑन इक्विटी 32 टक्के आहे. सेल्स ग्रोथ 18-19 टक्के आहे. याशिवाय नफ्यात 14-15 टक्के वाढ झाली आहे. तिमाही निकालांबद्दल बोलायचे तर, डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने 22 कोटीचा नफा सादर केला होता आणि डिसेंबर 2023 मध्ये कंपनीला 37 कोटींचा नफा झाला होता. कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी सुमारे 70 टक्के आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT