Sula Vineyards
Sula Vineyards  sakal
Share Market

Sula Vineyards : सुला वाइनयार्ड्सच्या शेअर्समध्ये भन्नाट तेजी...

शिल्पा गुजर

Sula Vineyards : सुला वाइनयार्ड्सच्या (Sula Vineyards) शेअर्ससाठी एप्रिलचा महिना फायदेशीर ठरत आहे. बुधवारी हे शेअर्स बीएसईवर 11 टक्क्यांनी वाढून 389.75 रुपयांवर पोहोचले. मात्र, नंतर त्याचे शेअर्स थोडे खाली आले.

दिवसभर सुलाच्या शेअर्समध्ये तेजी सुरु राहिली तर एनएसईवर 8.40 टक्क्यांनी वाढून 381.70 रुपयांवर व्यवहार करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी सुला वाइनयार्ड्सच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता, त्यानंतर आता तेजी दिसून आली आहे. (Sula Vineyards share are in growth share market news)

सुला वाइनयार्ड्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येण्याचे कारण म्हणजे त्याचे बिझनेस अपडेट आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत 15 टक्के वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचा वाईन टुरिझमचाही व्यवसाय आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत या व्यवसायाची वाढ 18 टक्के झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्याची वाढ 30 टक्के झाली आहे.

सुला विनयार्ड्स ही देशातील सर्वात मोठी आणि एकमेव लिस्टेड वाइन कंपनी आहे. एलीट आणि प्रीमियम वाईन व्यवसायात कंपनीचा 60 टक्के हिस्सा आहे.

सुला वाइनयार्ड्सच्या स्वतःच्या ब्रँडची विक्री दहा लाखांहून अधिक झाली आहे. यामध्ये एलीट आणि प्रीमियम वाईन केसेसच्या विक्रीचा मोठा हात आहे. त्याची विक्री पहिल्यांदाच 5 लाख केसच्या पुढे गेली आहे. कंपनीचे स्वतःच्या ब्रँड विक्री आणि पर्यटन व्यवसायातून होणारे वार्षिक उत्पन्न विक्रमी उच्चांकावर आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT