Tata Technologies IPO fully subscribed within 60 mins  Sakal
Share Market

Tata Tech IPO: 20 वर्षानंतर आला टाटांचा IPO, खरेदीसाठी तुटून पडले लोक, तासाभरात...

Tata Technologies IPO: आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

राहुल शेळके

Tata Technologies IPO: जवळपास 20 वर्षांनंतर बाजारात दाखल झालेल्या टाटा समूहाच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO सकाळी 10 वाजता उघडला आणि अवघ्या तासाभरात पूर्ण भरला. टाटा टेकने या IPO अंतर्गत 60,850,278 शेअर्ससाठी बोली मागवल्या होत्या आणि सकाळी 10.48 पर्यंत, उघडण्याच्या एक तासापूर्वी, 6,04,26,120 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाल्या.

टाटा टेक आयपीओने प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर 475-500 रुपये निश्चित केले आहे. IPO अंतर्गत लॉट साइज 30 शेअर्सचा आहे आणि प्राइस बँडनुसार, गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 15,000 रुपये गुंतवावे लागतील. शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सची लिस्ट 5 डिसेंबर 2023 रोजी होऊ शकते.

टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO

  • IPO तारीख: 22 ते 24 नोव्हेंबर

  • प्राइस बँड: रु 475-500/शेअर

  • इश्यू साइज: 3042.5 कोटी रुपये

  • लॉट साइज: 30 शेअर्स

  • किमान गुंतवणूक: रु 15,000

आयपीओबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे?

केजरीवाल रिसर्चचे संस्थापक अरुण केजरीवाल म्हणतात, “टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही ईव्ही सेगमेंटमधील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने ईव्ही सेगमेंटमध्ये जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांना मदत केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात (23 मार्च) कंपनीने 4414 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. हा आयपीओ सबस्क्राईब करावा, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

अनेक तज्ज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहणार असल्याचे ते म्हणतात. अनेक अहवालानुसार टाटा टेक्नॉलॉजीज आता एरोस्पेस क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. अशा स्थितीत कंपनीची वाढ अपेक्षित आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NISAR Satellite Launch : नासा-इस्रोचे ‘NISAR’ उपग्रह यशस्वीरित्या लाँच; श्रीहरिकोटातून ऐतिहासिक उड्डाण, उर भरून आणणारा व्हिडिओ व्हायरल

25% Tariff: अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला! आता वस्तूंवर २५% कर लागणार, अमेरिका दंडही वसूल करणार

Video: 'हॉटेल भाग्यश्री'वर आलं गाणं! मालकाची अ‍ॅक्टिंग बघितली का? यावंच लागतंय.s. यावंच लागतंयss..

Murud Crime : परराज्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल

Intermittent Fasting for Diabetes: इंटरमिटंट फास्टिंगने टाइप 2 मधुमेह आटोक्यात येतो का? वाचा संशोधन काय सांगतंय

SCROLL FOR NEXT