Jio Cinema esakal
Share Market

Reliance Jio: हॉलिवूडमध्ये अंबानींची एन्ट्री; हॉलीवूड प्रोडक्शन हाऊसशी केला करार, वाचा सविस्तर

जिओ सिनेमा Hotstar आणि Netflix ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

राहुल शेळके

Jio Cinema Multi Year Deal: लवकरच हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्स आणि मॅट्रिक्स सारखे चित्रपट मुकेश अंबानींच्या सिनेमा अॅपवर उपलब्ध होतील. यासाठी Viacom18 ने हॉलिवूडच्या प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सशी करार केला आहे.

याशिवाय मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एचबीओ कंटेंटसाठीही करार केला आहे. या करारानंतर जिओ सिनेमा भारतात अॅमेझॉन आणि हॉटस्टारला टक्कर देईल. वॉर्नर ब्रदर्सकडे अनेक आयकॉनिक चित्रपटांची यादी आहे, ज्यांना भारतातही खूप पसंती आहे.

जिओ वापरकर्ते गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर, डिस्कव्हरी ऑन जिओ सिनेमा यासारख्या उत्कृष्ट चित्रपट आणि शोचा आनंद घेऊ शकतील.

हे सर्व चित्रपट आणि शो यापूर्वी हॉटस्टारवर उपलब्ध होते. अशा परिस्थितीत हॉटस्टारकडून एवढी मोठी डील हिसकावून घेतल्यावर भारतात हॉटस्टारचे महत्त्व उरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांच्यात स्पर्धा होणार:

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने वॉर्नर ब्रदर्ससोबत त्याच्या प्रसारण उपक्रमासाठी करार केला आहे. करारानंतर हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे सर्व चित्रपट जिओ सिनेमात दाखवले जातील.

यामुळे जिओ सिनेमाचा आवाका तर वाढेलच, पण त्याला Amazon आणि Hotstar च्या बरोबरीने उभे राहण्यासही मदत होईल. या डीलमुळे केवळ वॉर्नर ब्रदर्सच नाही तर एचबीओचा कंटेंटही जिओ सिनेमावर दिसणार आहे.

विशेष बाब म्हणजे जिओ सिनेमाने आयपीएलच्या फ्री स्ट्रीमिंगद्वारे खूप लोकप्रियता मिळवली आहे. Viacom18 ने 2023 ते 2027 या कालावधीत सुमारे 2.9 बिलियन डॉलरमध्ये IPL डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत.

यापूर्वीचे हक्क डिस्ने हॉटस्टारकडे होते. जिओ सिनेमाने आयपीएलच्या माध्यमातून अनेक विक्रम केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जिओ सिनेमावर लवकरच सबस्क्रिप्शन सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT