Adani Vs Hindenburg Sakal
Share Market

Adani Vs Hindenburg: अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य; हिंडेनबर्गचा अहवाल...

दिग्गज गुंतवणूकदार आणि मोबियस कॅपिटलचे संस्थापक मार्क मोबियस यांनी अदानी समूहाच्या हिंडनबर्ग अहवालावर मोठे विधान केले आहे.

राहुल शेळके

Adani Vs Hindenburg: दिग्गज गुंतवणूकदार आणि मोबियस कॅपिटलचे संस्थापक मार्क मोबियस यांनी अदानी समूहाच्या हिंडनबर्ग अहवालावर मोठे विधान केले आहे. जानेवारी महिन्यात अदानी समुहाच्या हिंडेनबर्ग अहवालाने खळबळ उडाली होती.

या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते आणि समूहाच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली होती.

24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावरील संशोधन अहवाल सादर केला, ज्यामध्ये शेअर्स आणि कर्जाच्या फेरफारबाबत मोठे आरोप करण्यात आले होते. (Whole thing about Adani was overblown by Hindenburg says Mobius Capital’s Mark Mobius)

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचा ताण निश्चितच वाढला होता, असे मार्क मोबियसचे मत आहे. बिझनेस टुडेशी झालेल्या संभाषणात म्हणाले 'मला वाटते की हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अतिशयोक्ती केली असावी, मला वाटत नाही की हिंडनबर्गचा अहवाल पूर्णपणे अचूक होता.'

मोबियस यांनी सांगितले की, अदानी कुटुंबाचा सहभाग आणि कंपनीचे मोठे कर्ज हे हिंडनबर्ग अहवाल येण्यापूर्वीच माहीत होते. कंपनीत कुटुंबाचा सहभाग असल्याचे सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही काही लपलेली गोष्ट नव्हती. जास्त कर्जाची वस्तुस्थितीही सार्वजनिक होती.

अदानी समूहाकडे 'मोठी मालमत्ता' आहे :

हिंडेनबर्गचा अहवाल अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आला होता, ज्यामध्ये अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार, खात्यातील फसवणूक यासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते.

मात्र, अदानी समूहाने तो पूर्णपणे फेटाळला होता. पण या अहवालाने समूह कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. मोबियस यांनी असेही नमूद केले की अदानी समूहाकडे 'मोठी मालमत्ता' आहे. ते म्हणाले की GQG पार्टनर्सनेही समूहात गुंतवणूक केली आहे.

राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील GQG पार्टनर्सने हिंडनबर्ग अहवालानंतर मार्चमध्ये अदानी समूहात 15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती.

ते असेही म्हणाले की काही गुंतवणूकदारांनी, विशेषत: राजीव जैन यांनी अदानी समूहामध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत कारण त्यांना वाटते की ते दीर्घकालीन फायद्याचे असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आदींनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे. ते म्हणाले की हिंडेनबर्गने सर्वकाही अतिशयोक्तीपूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT