esakal

Sakal Money

Earn Lakhs Without Job : नोकरी न करताही तुम्ही मिळवू शकता लाखोंचं पॅकेज!, फक्त पास करा एक परीक्षा

Earn lakhs without a traditional job : जाणून घ्या, नेमकी ती कोणती परीक्षा आहे आणि आणखी काय फायदे मिळू शकतात?

Mayur Ratnaparkhe

UGC NET JRF Stipend Amount and Duration : सर्वसाधारणपणे असं असतं की, जर तुम्हाला चांगली गडगंज पगाराची नोकरी हवी असेल तर तुम्ही त्यासाठी तशाप्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे. मात्र जर तुम्हाला नोकरी न करताही दर महिन्याला चांगले पैसे मिळत असतील तर? आणि विशेष म्हणजे या बदल्यात तुम्हाला फक्त आपला अभ्यास सुरू ठेवावा लागेल. होय, हे खरंच आहे. भारतात एक परीक्षा अशीही आहे, जी तुम्ही पास केली तर तुम्हाला लाखोंचं पॅकेज सुरू होतं. यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा आणि दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत राहतात.

ही परीक्षा म्हणजे ‘यूजीसी नेट जेआरएफ’ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे आयोजित राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) चे अनेक फायदे आहेत. UGC NET उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन करिअर करण्याच्या संधी देते. UGC NET पात्रताधारक उमेदवार विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक किंवा व्याख्याते म्हणून अर्ज करू शकतात.

जर उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी पात्र ठरले तर त्यांना संशोधनासाठी आर्थिक सहाय्य (स्टायपेंड) मिळते. ते पीएचडी किंवा इतर संशोधन कार्यात खूप कामी येते. JRF साठी पात्र ठरलेल्यांना सिनियर रिसर्च फेलोशिप (SRF) साठी अर्ज करण्याची संधी देखील मिळते.

यूजीसी नेट जेआरएफ प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना भरीव मासिक स्टायपेंड मिळतो. ही रक्कम नोकरीसाठी नाही तर त्यांच्या अभ्यासासाठी आहे. जेआरएफद्वारे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि एखाद्या विषयात संशोधन करू शकतात. सरकार त्यांना मासिक फेलोशिप प्रदान करते.

२० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ५७२ व्या बैठकीत यूजीसीने फेलोशिपच्या सुधारित दरांवर चर्चा केल्यानंतर ही नवीन रक्कम निश्चित करण्यात आली. विज्ञान, मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्रातील जेआरएफला पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा ३७ हजार मिळतात. पूर्वी, ही रक्कम ३१ हजार होती. जेआरएफच्या दोन वर्षांनंतर, वरिष्ठ संशोधन फेलोशिप (एसआरएफ) साठी अर्ज करता येतो. एसआरएफमध्ये पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ४२ हजार रुपये मिळतात, तथापि, पूर्वी ही रक्कम ३५ हजार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT