dhing tang
dhing tang  
संपादकीय

मनकवडा (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बेटा : (जबर्दस्त एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (डोळे मिटून कपाळ चोळत) हंऽऽ..!
बेटा : (गंभीरपणाने) मम्मा, मम्मा...थांब! (खिश्‍यातून बामची बाटली काढत) हे घे!! कपाळाला लाव!!
मम्मामॅडम : (प्रेमभराने) तुम्हे कैसे पता की मेरा सर दर्दसे फटा जा रहा है?
बेटा : (गालातल्या गालात हसत)...मी ओळखलं! इंडियन पॉलिटिक्‍सची हीच तर खासियत आहे! दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखता येतं लग्गेच!!
मम्मामॅडम : (कपाळाला बाम चोळत) काहीतरीच तुझं! दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता आलं असतं तर आपल्या पक्षाची ही अवस्था कशी काय झाली असती? सगळे मेले पाताळयंत्री, विश्‍वासघातकी लोक जमलेत इथं! कुणावर विश्‍वास ठेवण्याची सोय राहिली नाही!!
बेटा : (मध्येच तोडत) सगळ्यांनाच ती कला असते असं नाही, मम्मा! पण मला दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे, हे नुसता चेहरा बघून सांगता येतं!! इन अदर वर्डस, आय ऍम मनकवडा!!
मम्मामॅडम : (चक्रावून) मनक वडा? हा कुठला वडा? डाळ वडा, बटाटा वडा, मेदू वडा माहीत होते...मनक वडा हे नवीनच ऐकतेय!
बेटा : (खुलासा करत) म-न-क-व-डा!! वन वर्ड!! दॅट मीन्स दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं!!
मम्मामॅडम : (हतबुद्ध होत)...आणि तुला तसं ओळखता येतं?
बेटा : (विजयी मुद्रेनं) येस्स!!
मम्मामॅडम : (खिडकीतून बाहेर बोट दाखवत) ते अहमद अंकल बघ!! खुर्चीत एकटेच मान खाली घालून बसलेत! काय चाललं असेल त्यांच्या मनात?
बेटा : (निरखून बघत) सोप्पंय! त्यांना ना...भूक लागलीये!! त्यांनी पोटावर हात ठेवलाय बघ!!
मम्मामॅडम : (थंडपणाने) चूक! त्यांच्या पोटात गोळा आला आहे, असा त्याचा अर्थ आहे!! गुजराथेतून मारे राज्यसभेचा अर्ज भरला; पण...(काहीतरी आठवून) ते जाऊ दे!! बिहारमधल्या भानगडींकडे लक्ष आहे की नाही तुझं? तिकडे लक्ष दे, असं मी तुला सांगितलं होतं!!
बेटा : (बेफिकिरीने)...नितीश अंकल माझ्याकडे गेल्या आठवड्यात आले होते! आश्‍चर्य म्हंजे तेव्हा त्यांनाही भूकच लागली होती! पण मी मुद्दाम लक्ष दिलं नाही!!
मम्मामॅडम : (किंचित नाराजीने) तीच चूक झाली तुझी!!
बेटा : (पटवून देत) पण माझ्याकडे एकच समोसा होता नाऽऽ...
मम्मामॅडम : (वैतागून) म्हणून ते तुझ्याकडून उठले आणि त्या कमळवाल्यांकडे जेवायला गेले!! कठीणच झालंय सगळं!! (कपाळाला हात लावत) काय करू? काही मार्ग दिसत नाही!!
बेटा : (जवळून निरखत)...भला इस लडके का क्‍या करें? असा विचार तू आत्ता करतेयस ना? मी बरोब्बर ओळखलं!!
मम्मामॅडम : (विषण्णपणाने) हा विचार मलाच काय, आख्ख्या देशाला छळतोय बेटा! पण तुझा हा मनकवडेपणा पक्षाच्या उपयोगी पडू दे, म्हंजे झालं!!
बेटा : (दुर्लक्ष करत) मला आत्ता ह्या क्षणी मनमोहन अंकल टु मोदी अंकल व्हाया लालू अंकल हे लोक काय विचार करत असतील, तेही सांगता येईल!!
मम्मामॅडम : (कोरडेपणानं) त्याचा राजकारणात काहीही उपयोग नाही, बेटा! नितीश अंकलच्या मनात काय आहे, हे माहीत असूनही आपल्याला बिहारमध्ये काय करता आलं?
बेटा : (गोंधळून जात) इसका मतलब...ह्या कलेचा राजकारणात काहीही उपयोग नाही?
मम्मामॅडम : (नकारार्थी मान हलवत) जोवर मतदाराच्या मनातलं तुला जाणून घेता येत नाही, तोवर काहीही उपयोग नाही, बेटा, काहीही उपयोग नाही...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT