dhing-tang
dhing-tang 
संपादकीय

ऐंशी हजाराची अळंबी!

ब्रिटिश नंदी

ऐकावे ते नवलच! मुलांनो, विश्‍वात अनेक रहस्ये असतात. ही रहस्ये शोधण्याच्या नादात माणूस अनेक शोध लावत असतो. मुलांनो, त्यानेच आपली प्रगती होत असते बरं! आपण आयुष्यभर सारखे शोध लावत बसावे. उदाहरणार्थ, आज आम्ही सकाळचा संपूर्ण वेळ पायमोजा शोधण्यात घालवला. मिळतच नव्हता. शेवटी युक्‍ती लढवली. शेजारच्या टॉम्याला बोलावून आणून त्यास एक बिस्कुट दिले. म्हटले, "" टॉम्या, यू यू...तो म्हणाला, ""तुझा मोजा शोधून द्यू?'' आम्ही "हो' म्हटले. तो "भो' म्हणाला. मग टॉम्या मोजा शोधत हुंगत हुंगत हिंड हिंड हिंडला. (हुंहुंहिंहिंहिं...) शेवटी न्हाणीघरातील कोपऱ्यात गेल्यावर त्याने "क्‍यॅक' असा केविलवाणा आवाज काढून पायात शेपूट दाबून पळ काढला. साहजिकच होते...कां की तिथेच आमचा पायमोजा पडलेला होता... 
मुलांनो, ऐकावे ते अजबच!! चीनमधील एका जपान्याने किंवा जपानमधील एका चिन्याने (म्हणे) एका कापडाचा शोध लावला आहे. ते कापड आंतरपाटासारखे आडवे धरले की पलीकडचा माणूस गायब होतो. आता आंतरपाटाच्या मागच्या मागे पळून जावेसे वाटणे, समजून घेण्यासारखे आहे. तसा काही लोकांनी प्रयत्नसुद्धा केला. पण अहह!! माणसास जागच्या जागी अदृश्‍य करणारे हे वस्त्र फार्फार उशिरा आले!! काही का असेना, सदर संशोधन महाजबरी आहे हे कोणीही कबूल करेल. ह्या कापडाचा नमोकुर्ता शिवला रे शिवला की माणूस कुठेही अदृश्‍य स्वरूपात जाऊ (किंवा येऊही) शकतो. सदर कापडाचा कुर्ता सध्या फक्‍त थोर ब्रह्मांडनायक श्रीश्री नमोजी हेच घालतात असे आढळून आले आहे. 

थो. ब्र. ना. श्रीश्री नमोजी ह्यांच्याबद्दल काय सांगावे? मागल्या खेपेला त्यांनी चीन आणि जपान ह्या दोन्ही देशांचे दौरे केले होते. त्या दौऱ्यानंतरच सदर संशोधकाने अदृश्‍य करणाऱ्या कापडाचा शोध लावण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले, असे म्हणतात. पण तेही एक असो. मुलांनो, जगातील अनेक रहस्यांपैकी आणखी एक रहस्य म्हणजे तैवानी अळंबी!! अळंब्यांचे प्राय: दोन प्रकार आढळून येतात. एक, तैवानी अळंबी आणि दुसरी हैवानी अळंबी! तैवानी अळंबी खाल्ल्याने मनुष्य पर्मनंट तरुण आणि गोराचिट्टा होत जातो आणि हैवानी अळंबी खाल्ल्यास मनुष्य कायमस्वरूपी खत्रुड आणि काळाठिक्‍कर पडत जातो. उदाहरणार्थ, आम्ही!..तुम्हास खोटे वाटेल, पण बालपणी आम्ही खरोखरच कमालीचे गोरे होतो. परंतु, एकदा चायनीजच्या गाडीवर मशरुम शेझवान राइस खाताना बहुधा हैवानी अळंबी पोटात गेली आणि आम्ही डांबरासारखे काळे झालो. पण तेही एक असू दे. 

तैवानी अळंबी शोधणे हे थोडे अवघड काम असते. म्हणूनच ती भयंकर महागदेखील आहे. ह्या अळंबीची किंमत ऐंशी हजार रुपयाला एक इतकी आहे. प्राचीन काळी थोर ऋषिमुनी आणि अर्वाचीन काळी गांधीवादी लोक सकाळी उठून मोजून पाच खजूर खात असत. पण हल्ली खजूर चांगले मिळत नाहीत, सबब ऋषिमुनीही दिसत नाहीत नि गांधीवादीही!! सकाळी उठून पाच खजूर खाल्ल्याने प्रकृती खुटखुटीत राहाते, हे सत्य आहे. थो. ब्र. ना. श्रीश्री नमोजी रोज सकाळी उठून पाच अळंब्या खातात. म्हंजे आपण जेव्हा फोडणीचा भात अथवा शिळी भाकरी-चहा अशी न्याहारी करत असतो, तेव्हा थो. ब्र. ना. श्रीश्री नमोजी चार लाखांच्या अळंब्या खात असतात. पूर्वी ते अल्पेसभाई ठाकोर ह्या गुजराथेतील ठाकोर समाजाच्या तरुण नेत्याएवढे काळे होते, पण तैवानी अळंबी खाऊन खाऊन ते टमाटरजेवा लालगुलाबी अने गोरे झाले, असे आम्हाला खुद्द अल्पेसभाई ह्यांनीच सांगितले. 

तैवानी अळंबी खाल्याने माणूस फेअर अँड लव्हली होतो हे खरे, पण आणखी काय काय होते? असे तुम्ही विचाराल! तर त्याचे उत्तर असे : दररोज चार लाखाची तैवानी अळंबी खाल्ल्याने मनुष्य प्रधानसेवक होतो!! विषय संपला!! कळले? जा आता घरी!! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT