संपादकीय

पार्सल! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. 
वेळ : मध्यरात्रीची... काळवेळच म्हणा! 
प्रसंग : निकराचा! 
पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई. 

कमळाबाई घाईघाईने ब्याग रिकामी करत आहेत. कुठूनतरी प्रवासाहून आल्या असाव्यात. इकडे तिकडे बघत त्या ब्यागेतील चीजवस्तू कपाटात दडवत आहेत. तेवढ्यात ताडताड पावले टाकीत उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे... 

उधोजीराजे : (सतरंजीकडे बघत) दरवेळी नाही हां होणार अपघात! दरवेळी आम्ही इथं आलो की आमचा हा पायीचा अंगठा तुमच्या दालनातील ह्या जाजमात अडकतो! आज येतानाच सावध होतो... 
कमळाबाई : (खोट्या लाडिकपणाने) अगदी शंभर वर्ष आयुष्य बघा एका माणसाला! ब्यागेतून हे दाढीचं सामान काढताना आम्हाला तुमचीच आठवण झाली होती... 

उधोजीराजे : (खचलेल्या आवाजात) तुमच्या प्रवासाच्या ब्यागेत दाढीचं सामान? आहोऽऽ... 
कमळाबाई : (गडबडून) जिभेला काही हाड एका माणसाच्या? हे तुमचं सामान चुकून आमच्या ब्यागेत आलं होतं, हेच सांगत होत्ये मी... 

उधोजीराजे : (नि:श्‍वास टाकत) अस्सं होय! मग ठीक आहे!! इथं आमच्या गालांवर काटा उभा राहिला त्याचं काय? बरं ते असू दे! (ब्यागेकडे नजर टाकत) कुठं निघालाय बाईसाहेबांचा दौरा? 
कमळाबाई : (खुलासा करत) निघालो नाही, येतोय परत!...अहमदाबादेला गेले होत्ये! 

उधोजीराजे : (नाक वाकडे करत संशयानं) हा कसला जळका वास भरून राहिलाय तुमच्या महालात? 
कमळाबाई : (ठसक्‍यात) ओळखा पाहू? 

उधोजीराजे : (टोमणा मारत)...हा फंदफितुरीचा वास तर नव्हे? 
कमळाबाई : (नाक मुरडत) कळतात बरं आम्हाला हे टोमणे! एखाद्याच्या मनासारखं करायला जावं तर मेलं दान उलटंच पडतं आमचं!! अहमदाबादेहून तुमच्यासाठी खास खमण ढोकळ्याचं रेडीमेड पाकीट आणलं होतं! आल्या आल्या ढोकळा केला, तर तुमचं हे असं टोचून बोलणं...(डोळ्याला पदर लावतात.) 

उधोजीराजे : (नमतं घेत) रागावू नका, बाईसाहेब! ढोकळ्याचा खमंग सुगंध आम्ही का ओळखला नाही? पण हल्ली मी ढोकळा खाणं बंद केलंय! 
कमळाबाई : (आश्‍चर्यानं) तुम्हाला आधी कित्ती आवडायचा ढोकळा! परातच्या परात उठवायचात! आता काय झालं? 

उधोजीराजे : (आंबट चेहऱ्यानं) ढोकळा हा फार वातुळ पदार्थ आहे हो!! भयंकर ग्यास धरतात!!..जाऊ द्या! उगीच नसता तपशील नको!! बाय द वे, अहमदाबादेत जाऊन नेमकं काय केलंत? 
कमळाबाई : (सहजपणाने) काऽऽही नाही! ते आमचं सीक्रेट आहे!! 

उधोजीराजे : (छद्मीपणाने) तुमचं काय सीक्रेट असतं, आणि काय पारदर्शक... तुमचं तुम्हालाच माहीत!! भाषा निर्मळ, पण मनात मळमळ!! तुमच्या हातात दौलतीचा कारभार सोपवून आम्ही फोटोग्राफीकडे फुलटाइम वळायचं ठरवलं होतं! पण नियतीच्या मनात काही वेगळंच असावं!.. 
कमळाबाई : (घाईघाईने) बाई बाई बाई! अहो, कोकणातल्या नारोबादादांनी कोकमं नि शेवकांडीच्या लाडवांचं पार्सल दिलं होतं नं...ते आमच्या अहमदाबादेच्या शहंशहांना नेऊन दिलंन इतकंच! कसलं सीक्रेट नि काय!! तुम्ही तरी अगदी पराचा कावळा करता हं!! 

उधोजीराजे : (वाईट्ट चेहरा करत) कोकमं आणि शेवकांडीचे लाडू? शी:!! असलं पार्सल पोचवण्यासाठी तुम्ही अहमदाबादेतपर्यंत गेलात? तेदेखील आम्हांस न विचारता? तुमची हिंमत कशी झाली? तुमच्या असल्या वागण्यामुळेच आम्हाला फंदफितुरीचे वास येतात!! 
कमळाबाई : (शांतपणे) इतकी डोक्‍यात राख घालून घेण्याचं काही कारण नाही! शेजारधर्म म्हणतात ह्याला!! तुम्ही अर्धा डझन पार्सलं घेतलीत मुंबई पालिकेतली!! आम्हाला विचारलंत? मग आम्ही नारोबादादांचं शेवकांडीच्या लाडवांचं पार्सल नेलं, कुठं बिघडलं? 

उधोजीराजे : (मान हलवत) गैर वागलात, बाईसाहेब! अगदी गैर वागलात! गैर वागलात, त्याहीपेक्षा गैर बोलिलात!! आता ह्या कुरिअरबाजीचं बक्षीस काय मिळालं तुम्हाला? 
कमळाबाई : (खुदकन हसत) ते ढोकळ्याचं पाकिट तिथूनच तर आणलंय!..खाणार ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT