leave in relationship
leave in relationship sakal
संपादकीय

कुटुंब डॉट कॉम : प्रयोग की पर्याय?

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ ही संकल्पना उदयाला आली तेव्हा साहजिकच तिच्या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया होत्या.

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ ही संकल्पना उदयाला आली तेव्हा साहजिकच तिच्या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काहींना ती विवाहसंस्थेचं पावित्र्य नाकारणारी, स्वैराचाराचं समर्थन करणारी, बेजबाबदार संकल्पना वाटली. काहींनी ‘एक फॅड’ म्हणून तिची संभावना केली. ‘रॅडिकल’ विचारांच्या मंडळींनी मात्र तिचं चांगलंच स्वागत केलं. विवाह ही संस्थाच मुळी कृत्रिम आहे. विवाहाद्वारे जी बंधनं लादली जातात, ती अनैसर्गिक तर असतातच, पण नेमकं त्यांच्याशीच ‘पावित्र्य’ जोडून ठेवलं आहे. त्यामुळे एकीकडे दडपणूक होत राहते, तर दुसरीकडे दांभिकपणाला प्रोत्साहन मिळते. अशा विचारांतून या मंडळींनी ‘लिव्ह इन’चं जोरदार समर्थन केलं. काहींनी तर ‘लिव्ह इन’मुळे कुटुंबसंस्थेला, लग्नसंस्थेला हादरे बसतील असंही भाकित वर्तवलं. अर्थात तसं काही (अजून तरी) झालेलं दिसत नाही.

एक मात्र खरं, ‘लिव्ह इन’ या पर्यायाकडे आता खुलेपणानं पाहायला हवं. आजच्या काळात तरुणाई तसंही खूप काही स्वातंत्र्य घेत असते. म्हणूनच जे ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतात त्यांचं स्वागतच करायला हवं. त्यांच्या प्रामाणिकपणाचं व धाडसाचं कौतुक करायला हवं. कारण असं की ही मंडळी - आमचं एकमेकांशी काही खास नातं आहे, आमच्या नात्याकडे आम्ही गांभीर्याने पाहतो, एकमेकांचा सहवास आम्हाला आवडतो - हे सारं ‘जाहीर’ करत असतात. ‘लिव्ह इन’मध्ये राहणारे ‘सेलेब्रेटिज’ पाहिले तर हे निश्‍चित जाणवतं की समाजासमोर ते एकमेकांना आदर देतात, परस्परांची कदर करतात. आपल्या नात्याची ‘डिग्निटी’ जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हेही दिसतं की स्वतःच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ मिळाला, की तो जोडीदारासोबतच घालवण्याला ते प्राधान्य देतात. एकत्र असणं, एकत्र राहणं ते अगदी मनापासून ‘एन्जॉय’ करीत असतात. समाजानंही आता ‘लिव्ह इन’ ही संकल्पना कळत नकळत स्वीकारली आहे. (आता तर ज्येष्ठांचं ‘लिव्ह इन’ही सुरू झालं आहे.) आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत तरुण-तरुणींना करिअरसाठी चोवीस तासही पुरेनासे झाले आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबामधून येणारी बंधनं नको आहेत. म्हणूनच ‘लिव्ह इन’चं आकर्षण वाढतं आहे.

मुख्य प्रश्‍न आहे तो हा की, तो विवाहसंस्थेला सक्षम पर्याय ठरू शकतो का? या संदर्भात ‘विवाह’ हा अभ्यासाचा विषय मानणाऱ्या ‘साथ साथ विवाह अभ्यासमंडळानं मांडलेले मुद्दे असे आहेत - ‘लिव्ह इन’मध्ये फक्त दोन व्यक्तींचा विचार असतो तर लग्नात दोन कुटुंबांचा विचार असतो. विवाहसंस्था ही टाइमटेस्टेड - काळाच्या कसोटीला उतरलेली आहे. लग्न हा एक जीवनाला सोपं बनविण्यासाठी निर्माण केलेला प्रकार आहे. तो कोणाच्या गळ्यात बांधण्यासाठी निर्माण केलेला नाही!

त्यामध्ये मागच्या आणि पुढच्या पिढीचा विचार केलेला आहे. त्यामध्ये जर ‘सॅक्रिफाईस’ असेल (जो ‘लिव्ह इन’मध्येही असू शकतो) तर त्यात फायदेही आहेत. भारतीय विवाहामध्ये आपल्या पालकांचा विचार, जोडीदाराचा विचार, मुलांच्या संगोपनाचा विचार.. यामुळे जे ‘फॅमिली युनिट्‌स’ बनत जातात, ते समाजाचे ‘बिल्डिंग बॉक्‍स’ असतात. हा विचार ‘लिव्ह इन’मध्ये दिसत नाही.’ अर्थात ‘लिव्ह इन’ हा ‘ट्रायल मॅरेज’चा ‘प्रयोग’ही ठरू शकतो. होय, पण इथे हेही स्पष्ट करायला हवं, की या ‘प्रयोगा’चे आजवरचे निष्कर्ष फारसे उत्साहवर्धक नाहीत. विख्यात समुपदेशक प्रतिभा घीवार यांनी केलेल्या पाहणीनुसार लग्नाआधी एकत्र राहणाऱ्या जोड्यांमध्ये विवाह असफल होण्याचं प्रमाण (थेट लग्न करणाऱ्या जोड्यांपेक्षा) अधिकच आहे! खरंतर ‘लिव्ह इन’चा फायदा एकच - कधीही तुम्ही ‘इन’चे ‘आऊट’ होऊ शकता. पण त्यामुळेच लग्नाचे जे असंख्य (व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक) लाभ आहेत, ते ‘लिव्ह इन’मध्ये मिळू शकत नाहीत. ‘लिव्ह इन’ हा काही काळ एकत्र राहण्याची हौस पुरी करणारा फक्त एक ‘प्रयोग’चं राहतो - तो लग्नसंस्थेला ‘पर्याय’ ठरत नाही.

यासंदर्भात आता काही संशोधनही झालं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक, यू.के. येथील संशोधकांनी लग्न झालेल्या आणि लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या - अशा दोन्ही प्रकारांतील दहा हजार जोडप्यांचं सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाचा असा स्पष्ट निष्कर्ष आहे की - लग्न झालेल्या जोड्यांमधील पुरुष आणि स्त्रिया - दोघांनाही आपल्या जोडीदारापासून जास्त आनंद आणि समाधान मिळत असतं. ‘लिव्ह इन’मधील जोडप्यांपेक्षा ते निश्‍चितच जास्त समाधानी असतात. याचं कारण असं की लग्नसंस्थेमध्ये पति-पत्नी हे भौतिक सुखांप्रमाणेच एकमेकांच्या सहवासातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या, चांगल्या-वाईट आणि सुखदुःखांच्या प्रसंगांमध्ये एकमेकांकरिता उपलब्ध असतात. ती हमी त्यांना विवाहबद्ध असण्यातूनच मिळत असते. पती-पत्नी एकमेकांच्या जीवनाचे भाग बनलेले असतात. त्या नात्यात आपलेपणा अधिक असतो, संरक्षण असतं, जपणूक असते.. हे सारं हवं असल्यास, ‘विवाह’ हाच ‘लिव्ह इन’पेक्षा सर्वतोपरी उजवा पर्याय ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT