Samruddhi Highway Accident esakal
Nagpur_old

Samruddhi Highway Accident: समृद्धीवर अपघात! कार पुलाला धडकून एकाचा दुर्दैवी मृत्यू; तिघे गंभीर जखमी

सिंदखेडराजा नजीकची घटना

सकाळ डिजिटल टीम

सिंदखेडराजा: समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली.

या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सदर अपघात आज २७ जून रोजी झाला. सर्व राहणार नाशिक येथील असून एकाचा कुटुंबातील आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नाशिक येथील राहणारे बनसोडे कुटुंब आज सकाळी अमरावतीहून एमएच २७ डीए १९२७ या क्रमांकाची कारने नाशिककडे जात होते.

दरम्यान सिंदखेड राजा जवळ चॅनल क्रमांक ३३५.९ वर चालकाला डुलकी लागून कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामध्ये नाशिकचे बनसोडे कुटुंब गंभीर जखमी झाले.

कारमधील सुरेश बनसोडे (वय ५०) हे गंभीररीत्या जखमी झाल्याने शासकीय रुग्णालय जालना येथे नेल्यानंतर औषध उपचार सुरू असताना त्याचा मृत झाला. तर दिनेश बनसोडे (वय ४५), सविता बनसोडे (वय ४०), अश्वजीत बनसोडे (वय१३) सर्व गंभीररीत्या जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळतात क्यू आर व्हीचे कर्मचारी अजय पाटील, अनुदीप पवार, परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेले.

जखमींना यासीन शहा व डॉ. बोराडे, चालक दिगंबर शिंदे व प्रवीण राठोड यांनी तत्काळ जालना शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले व अपघात ग्रस्त वाहन महामार्ग पोलिस पीएसआय शैलेश पवार पोलिस कर्मचारी नापोकाँ मुकेश जाधव ,प्रवीण राणे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान .भगवान गायकवाड, अजय पाटील ,श्रीराम महाजन यांनी वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT