Exercise
Exercise 
सप्तरंग

व्यायाम आणि विश्रांती

सकाळवृत्तसेवा

हेल्थ वर्क
संपूर्ण आयुष्य विश्रांती घेण्यातच घालवणाऱ्यांना विश्रांतीमधील मजा कधीच कळणार नाही. उत्तम संतुलित व्यायाम झाल्यावरच विश्रांतीची मजा कळते. प्रत्यक्ष व्यायाम करणे ही शरीराला आपण देत असलेली एक चेतना आहे.

विश्रांती घेताना शरीराची झीज भरून निघतेच, पण त्याचबरोबर शरीर पूर्वीपेक्षा थोडे अधिक कार्यक्षमही होते. विश्रांती ही त्याचमुळे व्यायामाइतकीच महत्त्वाची ठरते. ताकदीचे व्यायाम करताना शरीरातील स्नायूंबरोबर हाडांवर योग्य असा दाब पडतो, सांध्यामधील कूर्च्यांवर दाब पडतो. असा दाब दिल्यावर शरीर तो दाब पडल्यास तो अधिक कार्यक्षमरीत्या सहन होईल, अशा प्रकारे हाडातील अंतर्रचना बदलू लागते. अशाच प्रकारे कूर्चांचा आकार कार्यक्षम होईल, अशा प्रकारे वाढतो. त्याचबरोबर दाब सहन करण्याची ताकद वाढते. दमश्‍वासाचे व्यायाम करताना स्नायूंबरोबरच हृदय आणि फुफ्फुसे यांचाही सहभाग असतो.

फुफ्फुसाच्या सर्व भागांत हवा खेळू लागते. हृदयाचे ठोके जलद पडतातच पण त्याची आकुंचनाची ताकददेखील वाढते. हृदयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. स्नायूंमधील रक्तवाहिन्यांचे जाळे वाढते. त्याची कार्यक्षमता वाढून दीर्घकाळ काम करण्यास अनुरूप अशी होते. छातीच्या पिंजऱ्यातील स्नायू अधिक ताकदवान बनतात. छातीचे प्रसरण वाढते. लवचिकपणाचे व्यायाम करताना स्नायूंबरोबरच अस्थिबंध, सांध्याभोवतालचे आवरण आणि रक्तवाहिन्या, मज्जातंतू यातील जोडपेशी ताणल्या जातात. हळूहळू कोणतीही हालचाल करताना या अस्थिबंधाचा, सांध्याभोवतालच्या आवरणाचा अडथळा कमी होत जातो आणि हालचाली अत्यंत सुलभ आणि फार आकर्षकरीत्या गतिमान होतात. या सर्व फायदेशीर गोष्टी विश्रांतीकाळात होतात. व्यायाम करताना मुळीच होत नाहीत. व्यायामाचा अतिरेक किंवा अत्यंत कमी विश्रांती या दोन्ही गोष्टी शरीरास सारख्याच मारक ठरतात. 
(उद्याच्या अंकात वाचा - स्वास्थ्य आपले आपणच पाहायचे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT