All-is-well
All-is-well 
सप्तरंग

संवेदनशीलता आणि दया

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
संवेदनशील व्यक्ती स्वतःला कमकुवत समजतात. स्वतःला सामर्थ्यवान समजतात, ते नेहमी संवेदनाहीन असतात. काही लोक स्वतःबाबत संवेदनशील असतात, मात्र इतरांबाबत भावनारहित असतात. त्यांना कायम वाटते, की बाकी सर्व लोक वाईट आहेत. स्वतःबद्दल संवेदनशीलता न बाळगता ती इतरांविषयी बाळगतात. ते कित्येकदा स्वतःला ‘गरीब बिचारा’ समजू लागतात. संवेदनशीलतेमुळे नेहमी दुःखच पदरी पडते. त्यामुळे हळवेपणा नसणेच बरे, असा निष्कर्ष काहीजण काढतात. ते त्यांच्या मनाची कवाडे बंद करतात; पण ध्यानात असू द्या की, तुम्ही संवेदनशील नसल्यास जीवनातल्या सगळ्या तरल गोष्टींना मुकाल, उदा. अंतर्ज्ञान, सौंदर्य आणि प्रेमाचा परमानंद. संवेदनाहीन लोकांना त्यांच्यातला कमकुवतपणा कळत नाही आणि संवेदनाशीलता ही आपली शक्ती आहे, हे संवेदनशील लोकांना कळत नाही. हा मार्ग आणि हे ज्ञान तुम्हांला सामर्थ्यवान आणि संवेदनशील बनविते. संवेदनशीलता म्हणजे अंतर्ज्ञान. संवेदनशीलता म्हणजे करुणा. संवेदनशीलता म्हणजे प्रेम. संवेदनशीलता ही खरी ताकद आहे. शांतपणा, सहनशीलता, मौन, स्थितप्रज्ञता, विश्वास, श्रद्धा आणि स्मित हीही ताकदच. संवेदनशील आणि सामर्थ्यवान दोन्ही बना.

दया
दया दोन प्रकारची असते. एक म्हणजे सुज्ञ लोकांची दया आणि दुसरी अज्ञानी लोकांची. अज्ञानी लोकांची दया ही कृतीच्या फळाच्या रोखाने असते. आजारपण किंवा व्यथा यांचे ते परिमाण आहे, परंतु सुज्ञ व्यक्तीची करुणा ज्ञानाच्या अभावाच्या रोखाने असते. आजारपण किंवा व्यथा यांच्या मुळाशी असलेले कारण ती शोधते. व्यथेसाठी असलेली दया अज्ञान दर्शवते. व्यथा ही कर्माने येते आणि तुमचा कर्मावर विश्वास असल्यास दया कुठे आहे?

प्रत्येकजण स्वतःच्याच कर्माची फळे वेचतो. न्यायाधीशाला सर्वच गुन्हेगारांबद्दल दया असली, तर सगळे तुरुंग रिकामे होतील. न्यायाधीश गुन्हेगारांशी दुष्टपणे वागतात का? नाही. न्यायाधीशांची दया ज्ञानाच्या अभावासाठी असते, गुन्हेगारांच्या व्यथेसाठी नाही. व्यथा हे तर गुन्हेगारांचे कर्म असते. बहुतेक वेळा लोकांना वाटते की, दया हे कृत्य, कृती आहे. दया हा तुमचा स्वभावच आहे. हे समजून घ्या मग तुम्हाला दिसेल, की कर्म आणि दया हे एकमेकांच्या विरोधात नाहीत, उलट ते एकमेकांना पूरक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT