सप्तरंग

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला शह देत भाजप मुंबई जिंकणार?

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप-शिवसेना युतीची शक्यता आहे; पण जागावाटपाच्या तिढ्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असल्याने युतीचा निर्णय पुढच्या एक-दोन दिवसांत होईल. सध्या या दोन्ही पक्षांत आकड्यांचे खेळ सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयाकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तर मुंबईचे कुरुक्षेत्र होणारच. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असलेली मुंबई ताब्यात घेणे हे भाजपचे लक्ष्य आहे; तर तसे होऊ नये, यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे.

एकंदर विधानसभेच्या या निवडणुकीला रंग आहे तो मुंबईवरील वर्चस्वासाठीच्या संघर्षाचा. मुंबईत एकूण 36 पैकी शिवसेनेचे 14; तर भाजपचे 15 आमदार. वडाळा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे खंदे समर्थक कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये, तर वरळी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आहेत.

वरळीतून आदित्य ठाकरे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यांनी विधानसभा लढविली, तर राजकारणात निवडणूक लढविणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिलेच असतील. आदित्य यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे आणले आहे; पण ही 2019 ची नव्हे, तर 2024 ची तयारी आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे खचलेपण मुंबईत अधिकच अधोरेखित होत आहे. बड्या गयारामांमुळे कॉंग्रेसचे अवसान गळाले आहे. ऊर्मिला मातोंडकर हा कॉंग्रेसचा जनमानसातील एक लोकप्रिय चेहरा ठरू शकला असता; पण पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. हा कॉंग्रेसचा जुनाच आजार. तो या वेळीही उफाळून आलेला आहेच.

मुंबईत कॉंग्रेसचे पाच आमदार आहेत. त्या जागा कशा टिकवायच्या, हे मोठे आव्हान ठरणार आहे. अर्थात, लोकप्रतिनिधींनी पक्षांतर केले असले तरी, कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले नसल्याचे चित्र अनेक मतदारसंघांत दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे "राष्ट्रवादी'ला खातेही उघडता आले नाही. "राष्ट्रवादी'चा वरळीचा गडही शिवसेनेने काबीज केला आहे. पुन्हा नव्या जोमाने "राष्ट्रवादी'नेही बांधणी सुरू केली असली तरी, मुळातील त्यांचा प्रभावच तुटपुंजा.

मनसेची भूमिका महत्त्वाची

या पार्श्विभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वाची ठरते. विक्रोळी, भांडुप, मुलुंड, घाटकोपर पश्चि्म, माहीम आदी मतदारसंघांत मनसेची ताकद आहे. मनसे मुंबईत लढली, तर शिवसेनेलाच त्याचा फटका अधिक बसेल आणि वंचित बहुजन आघाडी लढल्यास त्याचा फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बसण्याची शक्यबता आहे. एका अर्थाने मनसे आणि वंचित भाजपसाठी फायदेशीर आहेत. एकंदर मुंबईतील भाजपचे संख्याबळ वाढण्याची शक्यअता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT